पारनेर : प्रतिनिधी यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, कै .मधु दंडवते यांनी आपल्या कामातून देशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. दंडवते यांच्या विचारांची आजच्या राजकारणात, समाजकारणात खऱ्या अर्थाने गरज आहे. आजच्या राजकारणाची वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे आपण पाहतो. आजच्या राजकाण्यांनी दंडवते यांचे विचार आचारणात आणणे गरजेचे आहे. दंडवते मंत्री असतानाही रिक्षाने प्रवास करीत इतका साधेपणा त्यांनी आपल्या जीवनात जपला होता असे लंके म्हणाले.
पहिला आमदार निधी स्नेहालय संस्थेला:
-मी सन २०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर आमदार निधीतून कामे सुचविण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी विचार केला की आमदार निधीतून पाहिले काम कोणते द्यावे ? मी किती वेळा आमदार होईल हे माहीती नाही, परंतू मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर पहिला आमदार निधी स्नेहालय संस्थेमधील सभामंडपासाठी देण्याचा निर्णय घेतला. हा पहिला निधी माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आतापर्यंत मी १ हजार ५०० कोटींचा निधी मतदारसंघासाठी आणला मात्र हा निधी कोणत्या कामांना, कोणत्या गावांना दिला हे लगेच सांगता येणार नाही. मात्र पाहिल्या कामच्या निधीची आठवण कायम राहिल. असे लंके यांनी सांगितले.
दंडवते यांनी विचारांशी तडजोड केली नाही:
-ज्यांना पंतप्रधानपदाची खुर्ची खुणवत असतानाही दंडवते यांनी आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. हल्ली राजकारणात सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात तर संध्याकाळी तिसऱ्या पक्षात अशी अवस्था झाली आहे. मलाही कळत नाही. आजूनही मी त्या धक्क्यातून बाहेर पडलेलो नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रसमध्ये पडलेल्या फुटीवर आ. लंके यांनी भाष्य केले.
हल्ली राजकारणात सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात तर संध्याकाळी तिसऱ्या पक्षात अशी अवस्था झाली आहे. मलाही कळत नाही. आजूनही मी त्या धक्क्यातून बाहेर पडलेलो नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रसमध्ये पडलेल्या फुटीवर आ. लंके यांनी भाष्य केले.
स्वातंत्र सेनानी,जिल्ह्याचे सुपुत्र तसेच माजी केंद्रीय रेल्वे व अर्थ मंत्री मधु दंडवते यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श लोकप्रतिधी पुरस्काराने पारनेरचे आ.निलेश लंके यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी बोलताना आ.लंके यांनी प्रा.मधु दंडवते यांनी आयुष्यात विचारांशी कधी तडजोड केली नाही हे सांगताना गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीवर हे भाष्य केले. मधु दंडवते यांच्या नावाने पुरस्कार मिळाला असल्याने माझी जबाबदारी वाढली असल्याचे सांगतानाच या पुरस्काराचे श्रेय मतदारसंघातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना,दीन दुबळे, अंध, अपंग यांना आहे.माझ्या प्रत्येक कामात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. हा पुरस्कार मी त्यांना समर्पीत करतो असे आमदार नीलेश लंके यांनी सन्मानाला उत्तर देताना सांगितले.
प्रा.मधु दंडवते जन्मशताब्दी महोत्सव समिती,स्नेहालय,रावसाहेब पटवर्धन स्मारक,राजमुद्रा अकादमी, मेजर दिनूभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळ,पेमराज सारडा महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग, स्वयंसेवी संस्थांचा महासंघ आज, सोमवारी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. लंके यांना प्रा. मधू दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २५ हजार रूपये रोख, सन्मानपत्र, संविधानाची प्रस्तावना आणि सकस वैचारीक पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मधू दंडवते यांचे चिरंजीव उदय दंडवते, साधाना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, विजयाताई चौहान, स्नेहालयच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड,श्याम असावा,हेरंब कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, दादाभाऊ कळमकर, शिवाजी नाईकवाडी, अभिषेक कळमकर, अॅड. राहुल झावरे, अर्जुन भालेकर, सरपंच राजेंद्र शिंदे, संदीप शिंदे, शिवाजी शिंदे, डॉ. बाळासाहेब कावरे, योगेश मते, भूषण शेलार, डॉ. सचिन औटी, अजय लामखडे, बाळासाहेब खिलारी, किसन रासकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्नेहालयाचे काम पर्वताएवढे :
-सध्या आपल्याला काही मिळेल का अशी वृत्ती वाढत चालली आहे. हातभर काम करून जसे काही पर्वत उचलून आणला असल्याचे दाखविले जाते. स्नेहालय संस्थेचे काम पर्वताएवढे मोठे आहे. मात्र त्यांनी त्याचा कधीही गवगवा केला नाही. जाहिरात केली नाही. ज्यावेळी आपण संस्थेत जातो त्यावेळी गिरीश कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांची किंमत कळते.