Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
23.4 C
New York
Sunday, August 24, 2025

गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद..

गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद..

श्रीरामपूर येथील सोनाराचे दुकान फोडणारे 04 आरोपी जालना येथून जेरबंद
आरोपीकडून 11 किलो 230 ग्रॅम चांदीसह 14,07,000/- रू कि.मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई
—————————————————————————————–
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी  निखील विजय नागरे, वय 34, धंदा सराफ (रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स) रा.सद्गुरूकृपा, सावता रोड, वॉर्ड नं.03, श्रीरामपूर हे दिनांक 17/07/2025 रोजी रात्री 20.30 वा.सराफ दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरटयांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील ड्रॉवर व कपाटामधील सोन्याचे दागीने व चांदीचे दागीने, लगड असा एकुण 26,59,745/- रू किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 681/2025 बीएनएस कलम 305 (अ), 331 (4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

मा.पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्हयातील ना उघड घरफोडीच्या गुन्हयांचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/ अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

- Advertisement -

पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनाठिकाणी भेट देऊन, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून नमूद गुन्हा हा गोपीसिंग टाक, रा.जालना व शिवाजी प्रल्हादराव सासनिक, रा.जालना अशांनी त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न केले. दिनांक 22/07/2025 रोजी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे जालना येथे असल्याची माहिती मिळाली.पथकाने मिळालेल्या माहितीवरून जालना तालुका पोलीस स्टेशन, जि.जालना येथे जाऊन जालना तालुका पोलीस स्टेशन येथील पोहेकॉ/815 दत्तात्रय साळुबा मेहत्रे यांचे मदतीने संशयीत आरोपीचा शोध घेऊन 1) गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक, वय 25 2) दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक, वय 28 अ.क्र.1 व 2 रा.सिध्दार्थनगर, ता.जि.जालना मुळ रा.गुरूगोविंदसिंगनगर, शिकलकरी मोहल्ला, टाक हाऊस, जालना 3) शिवाजी प्रल्हादराव सासनिक, वय 36, रा.रेणुकामाता मंदिराजवळ, गांधीनगर, जालना 4) अमित नंदलाल दागडिया,वय 32, रा.खरपुडी रोड, हरीगोविंदनगर, जालना अशांना ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपीकडे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं 681/2025 च्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक याने त्याचे वरील साथीदारासह दि.17/07/2025 रोजीचे रात्री त्यांचेकडील होंडा कारमधुन जाऊन श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर येथे सोनाराचे दुकानामध्ये चोरी केल्याची माहिती सांगीतली.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून 14,07,000/- रूपये किंमत त्यात होंडा कंपनीची सीटीझेड एक्स कार क्रमांक एमएच-03-एझेड-5458, 5 मोबाईल, 11 किलो 230 ग्रॅम चांदीचे दागीने व लगड, 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यातील आरोपी दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक याचेवर दाखल गुन्हयाचा अभिलेख पडताळणी केलीअसता त्याचेवर जालना जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनला यापुर्वी दरोडा तयारी, घरफोडी व चोरीचे खालीलप्रमाणे 14 गुन्हे दाखल आहेत.

दाखल गुन्हयांची माहिती
1) हसनाबाद जि.जालना 1/2016 भादवि  क457,380.
2) सदर बाजार जालना 28/2014 भादवि क 379,34.
3) सदर बाजार जालना 127/2018 भादवि क 457,380.
4) कदीम पोस्टे जि.जालना 93/2017 भादवि क 457,380.
5) सदर  बाजार 107/2012 भादवि क 457,380.
6) कदिम जालना 212/2013 भादवि क 457,380.
7) तालुका पोस्टे जालना 249/2014 भादवि क 379.
8) सदर बाजार जालना 330/2015 भादवि क 457,380.
9) कदिम जालना 198/2016 भादवि क 454,457,380.
10) सदर बाजारा जालना 239/2015 भादवि क 454,457,380.
11) सदर बाजार जालना 489/2016 भादवि क 379,34.
12) तालका पोस्टे जि.जालना 272/2014 भादवि क 380,461.
13) तालुका पोस्टे जि.जालना 142/2015 भादवि क 399,402.
14) सदर बाजार जालना 133/2018 भादवि क 399,401,402,सह आर्म 4/25.

- Advertisement -

ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे.

सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. सोमनाथ वाकचौरे,अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व मा.श्री.बसवराज शिवपुजे,उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा