Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
13 C
New York
Tuesday, October 13, 2026

एमपीएससी’चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा

एमपीएससी’चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा

पुणे :औषध निरीक्षक (Drug Inspecter) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून आणि इतर मागण्यांसाठी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या MPSC उमेदवारांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज सहावा दिवस असून यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी विवेक भिमानवार यांनी दोन दिवसांपूर्वी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठवल्याचा खळबळजनक दावा केला आहे. यावर अधिक बोलताना रोहित पवार म्हणाले की वास्तविक भिमनवार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे देणे आवश्यक आहे. मात्र त्यांनी आपला राजीनामा आपले जिवलग मित्र असलेल्या फडणवीस यांच्याकडे देऊन फडणवीस यांच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. पर्वा (रविवारी) सायंकाळी राजीनामा पाठवूनही फडणवीस यांनी यावर चुप्पी साधली असली तरी आमच्याकडे भिमनवार यांनी राजीनामा पाठवल्याची पक्की माहिती आहे. यात फडणवीस यांनी अद्याप निर्णय न घेतल्याने एकीकडे आपल्या मित्राला वाचवण्याचा हेतू असताना दुसरीकडे फडणवीस यांनी आता हा विषय “इगो”चा केला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. फडणवीस यांच्या साठी जर भिमनवार यांचा राजीनामा पुढे राज्यपालांकडे मंजुरी साठी पाठवला तर उद्या जनता अनरकांचे8राजीनामे मागतील कदाचित फडणवीस यांचाही राजीनामा मागतील, त्यामुळे फडणवीस यांनी आता हा विषय वैयक्तिक इगोचा केला असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक लक्ष्मीकांत भीमनवार (IAS) हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) सध्याचे अध्यक्ष आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली असून, फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांनी अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला. ते २००९ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी असून, यापूर्वी त्यांनी राज्याचे परिवहन आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.
सध्या ते खालील घडामोडींमुळे कमालीचे चर्चेत आहेत:
• राजीनाम्याची मागणी व विद्यार्थ्यांचे आंदोलन: औषध निरीक्षक (Drug Inspector) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून आणि इतर मागण्यांसाठी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या MPSC उमेदवारांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
• गच्छंतीची शक्यता (कलम ३१७): विद्यार्थ्यांचा वाढता रोष लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना पत्र लिहून संविधानाच्या कलम ३१७ नुसार विवेक भीमनवार यांच्या चौकशीची आणि त्यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली आहे.
• भीमनवार यांची भूमिका: आमदार रोहित पवार व आंदोलकांनी केलेल्या आरोपांनंतर विवेक भीमनवार यांनी आपली बाजू मांडली असून, आपल्यावर खोटे आरोप करून प्रतिमा मलिन केली जात असल्याचे सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा