Latest news
डॉ.सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची एकमताने निवड चेअरमन पदाचे नाव घोषित होईल त्यावेळी सर्वांना धक्का बसेल! सुजय विखेंनी वाढवला सस्पेन्स!! सुजय विखे आज पुन्हा उतरले मनमाड रस्त्यावर.. वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!! एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!!
8.4 C
New York
Thursday, November 19, 2026

चेअरमन पदाचे नाव घोषित होईल त्यावेळी सर्वांना धक्का बसेल! सुजय विखेंनी वाढवला सस्पेन्स!!

न्यूज9 महाराष्ट्र.. न्युजनगरी

चेअरमन पदाचे नाव घोषित होईल त्यावेळी सर्वांना धक्का बसेल! सुजय विखेंनी वाढवला सस्पेन्स!!

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसक्तही दहा संचालक पदासाठी आज सोमवारी (2 नोव्हेंबर) रोजी मतदान होत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक घोषित झाल्यापासूनच माजी खासदार आणि भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांचे नाव चेअरमन पदासाठी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्यांचे नाव सोडून इतर कोणत्याही बिनविरोध निवडून आलेल्या 11 संचालक किंवा आज पार पडत असलेल्या मतदानानंतर निवडून येण्याची शक्यता असलेल्या उमेदवाराचे नाव चर्चेत आले नाही. त्यामुळे सुजय विखे यांचीच चेअरमन पदी निवड होणार असेच चित्र अद्यापी असताना आज सुजय विखे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर एक वक्तव्य करून मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. पत्रकारांनी त्यांना आपले नाव चेअरमन पदासाठी असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया विचारली असता विखे यांनी, कोणतीही निवडणूक आली की माझे नाव नेहमीच चर्चेत असते त्यामुळे याही वेळी जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी तुम्हीं लोकांनी माझे नाव चर्चेत ठेवले आहे, असे सांगताना, पण मी विश्वासाने सांगतो की ज्या वेळी चेअरमन पदाचे नाव घोषीत होईल त्यावेळी सर्वांना धक्का बसेल!! असे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने जर या पदावर सुजय विखे नसतील तर कोण असेल याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच त्यांनी, नाव घोषित झाल्यानंतर धक्का बसेल, असे सांगितल्याने बहुतांशी या पदावर कुणाच्यात तरी नावावर निश्चितच चर्चा झाली असल्याचेही दिसून येत आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

- Advertisement -

आज अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता येथील सेंट जॉन स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची आर्थिक संस्था असून, शेतकरी, कष्टकरी आणि दूध उत्पादकांसाठी भक्कम आधारस्तंभ म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये बँकेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक बळकट व्हावी, शेतकऱ्यांचे हित जपले जावे आणि बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सक्षम आर्थिक आधार मिळावा, अशी अपेक्षा डॉ विखे यांनी यानिमित्ताने केली

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा