Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
14.3 C
New York
Tuesday, October 13, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!!

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!!

अहिल्यानगर: विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी अर्ज घेतल्यानंतर आणि अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्यानंतर अशा दोन्ही वेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदेंवर बोचरी टीका केली.

आ.रोहित पवारांची चेतावणी ठरली महत्वाची!!
:”तीन अपत्ये असूनही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. विधानपरिषदेसारख्या कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींनाच कायदे-नियम माहित नसतील तर याला काय बोलावं? त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय पण यानिमित्ताने राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही त्यांनी महाराष्ट्राला दर्शन घडवलं.” अशी चेतावणी आ. रोहित पवारांनी राम शिंदे यांनी निवडणुकीचा अर्ज  घेतल्यानंतर व्यक्त केली होती. त्यामुळे तीन अपत्यांमुद्य्यावर अर्ज बाद झालाच तर राज्यात नाचक्की होईल या भीतीने अर्ज भरण्याचे टाळले अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र राम शिंदे यांनी निर्णय जाहीर करण्यावेळी कायद्यातील तरतुदींचा उल्लेख करत तीन अपत्यांमुळे कायदेशीर अडचण नसल्याचे सांगितले. त्यामुळे कसलीच अडचण नव्हती तर अर्ज घेऊन तसेच मतदार सहलीला पाठवून वातावरण निर्मिती का केली हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

- Advertisement -

दरम्यान राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघारी घेण्याचे स्पष्ट होताच आ. रोहित पवार यांनी राम शिंदेंवर बोचरी टीका करताना निशाणा साधला आहे, आपल्या X हँडलवर रोहित पवारांनी म्हंटले आहे की,
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आधी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा गाजावाजा करुन अर्ज भरला, पण त्यांना तीन अपत्ये असल्याची बाब आम्ही समोर आणताच त्यांना अचानक पदाची अप्रतिष्ठा होऊ नये असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी माघार घेतली. आधीच नियमांचा आदर केला असता तर आज अर्ज माघारी घेण्याची नामुष्की त्यांच्यावर वेळ आली नसती आणि  संविधानिक पदाचीही अप्रतिष्ठा झाली नसती. आता चोरी पकडली गेल्यानंतर प्रामाणिकपणाचा आव आणण्याचा हा प्रकार आहे.. दुसरं काय…!
-आ.रोहित पवार

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा