Latest news
डॉ.सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची एकमताने निवड चेअरमन पदाचे नाव घोषित होईल त्यावेळी सर्वांना धक्का बसेल! सुजय विखेंनी वाढवला सस्पेन्स!! सुजय विखे आज पुन्हा उतरले मनमाड रस्त्यावर.. वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!! एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!!
8.4 C
New York
Thursday, November 19, 2026

सुजय विखे आज पुन्हा उतरले मनमाड रस्त्यावर.. वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!!

सुजय विखे आज पुन्हा उतरले मनमाड रस्त्यावर.. वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!!

राहुरी :

नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. येत्या दोन दिवसांत प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांची बैठक घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

- Advertisement -

नगर-मनमाड महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वाहनचालकांसह प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे तसेच चिंचोली फाटा ते कोल्हारदरम्यान वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली असून, वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा वेळ वाया जात आहे.

या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरी फॅक्टरी येथे थांबून परिस्थितीची पाहणी केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

- Advertisement -

तसेच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याशी चर्चा करून वाहतूक व्यवस्थापनाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.
दरम्यान, सकाळपासूनच डॉ. सुजय विखे पाटील यांचे सहकारी आणि पोलीस प्रशासन वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्नशील होते. वाहनांची ये-जा सुरळीत व्हावी आणि प्रवाशांना दिलासा मिळावा, यासाठी वाहतूक नियंत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
मात्र, वारंवार निर्माण होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. यासाठी येत्या दोन दिवसांत प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांची बैठक घेऊन उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनचालक आणि प्रवाशांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा