अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती
९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे माऊली सभागृहात आयोजन
केरळचे राज्यपाल महामहीम राजेंद्र अर्लेकर उपस्थित राहणार
अहिल्यानगर: पंडित दीनदयाळ यांच्या विचारांना अभिप्रेत असलेल्या समाज निर्मितीसाठी पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान यांच्या वतीने दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान “पंडित दीनदयाळ व्याख्यानमाले” चे माऊली सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
युवकांना प्रेरित करणारे प्रसिद्ध वक्ते विश्वास नांगरे पाटील, अखिल भारतीय मुस्लिम मंचचे अध्यक्ष फैजखान , महाभारत या टीव्ही मालिकेला ज्यांनी ‘मै समय हूं, असा आपला आवाज देऊन ती मालिका अजरामर बनवली असे प्रख्यात आवाजतज्ञ हरीश भिमाणी, ऑब्झर्वर मासिकाचे नवी दिल्ली येथील मुख्य संपादक प्रफुल्ल केतकर हे या व्याख्यानमालेचे यंदाचे वैशिष्ट्य राहील. केरळचे राज्यपाल महामहीम राजेंद्र अर्लेकर, जेष्ठ अर्थतज्ज्ञ आणि रेणुका माता मल्टीस्टेटचे अध्यक्ष प्रशांतजी भालेराव, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा कांकरिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिमांचल प्रमुख नानासाहेब जाधव आदी मान्यवर या व्याख्यानमालेसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
“सामर्थ्य अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही,शुद्ध विचाराने नियंत्रित केलेल्या कृतीत असते, असे विचार मांडणाऱ्या पंडितजींच्या राष्ट्रनिर्मिती संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेचे हे ११ वेळ वर्ष आहे. ऑपरेशन सिंदूर प्रमाणे यंदा शब्द बाणांनी सुसज्ज अशा वक्त्यांना आणि त्यांच्या धगधगत्या विचारांना ऐकण्याची सुवर्णसंधी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने नगरकरांना उपलब्ध झाली असल्याचे लोढा यांनी सांगितले.
पंडित दीनदयाळ पतसंस्था व पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान ट्रस्ट अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दहा वर्षापासून अहिल्यानगर शहरात पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.
पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच्या माध्यमातून शहरात सांस्कृतिक चळवळीला बळ मिळत आहे.तसेच अनेक विचारवंत,लेखक,साहित्यिक, राजकीय नेते,उद्योजक, समाजसेवक,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी
या व्यासपीठावर व्यक्त होऊन शहर व देशाला दिशा देण्याचे कार्य केले आहे.
या व्याख्यानमालेत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान,राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी,अँड.आश्विनी उपाध्याय,प्रसिद्ध विधीज्ञ अँड.उज्वल निकम,मनिंदर बिट्टा,प्रसिद्ध पत्रकार पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ,केंद्रीय राज्यमंत्री माजी केंद्रीय राज्यमंत्री सत्यपाल सिंह,प्रखर हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता आदी दिग्गज व्याख्यात्यांनी या व्याख्यानमालेत हजेरी लावली आहे.
गेल्या दहा वर्षापासून शहरात समाज प्रबोधनाचे कार्य व विचारांचे मंथन या व्याख्यानमालेच्या माध्यमातून होत आहे.देशाची सध्याची सामाजिक परिस्थिती,राजकीय जडणघडण,सांस्कृतिक परंपरा, हिंदू संस्कृती व औद्योगिक क्षेत्रात होणारे क्रांतिकारी बदल व देशाची बदलती परिस्थिती या सर्व विषयांवर प्रकाश टाकणारी व विचारवंतांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारी ही महाराष्ट्रातील नावलौकिक प्राप्त झालेली एकमेव व्याख्यानमाला आहे.
या व्याख्यानमालाच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराला एक संस्कृतीक मेजवानीच मिळत आहे.मागील वर्षी या व्याख्यानमालेला नगरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.याही वर्षी मोठ्या प्रमाणात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेला झालेली गर्दी पाहता यावेळी व्याख्यानमालेच्या नियोजनात मोठे बदल करण्यात आले.दोन ते अडीच हजार प्रेक्षकांना या व्याख्यानमालेचा लाभ घेता येईल.अशी बैठक व्यवस्था सावेडी येथील माऊली सभागृहात करण्यात आली आहे. तसेच या व्याख्यानमालाच्या प्रचारासाठी शहरातून एलईडी व्हॅन चौका चौकात जाऊन वक्त्यांचे, व प्रमुख पाहुण्यांचे मुलाखती दाखविण्यात येणार आहे.या व्याख्यानमालेसाठी अहिल्यानगर वासीयांनी उपस्थित राहावे.असे आवाहन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक तथा पंडित दीनदया परिवार प्रतिष्ठान ट्रस्ट चे प्रवर्तक वसंत लोढा यांनी केले आहे.
गुरुवार दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी जगाचे बदलते रूप आणि भारताचा वाटा या विषयावर प्रफुल्लजी केतकर यांचे व्याख्यान होईल. उद्घाटक केरळचे राज्यपाल महामहिम राजेंद्र आर्लेकर हे आहेत.तर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव हे आहेत.
शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रप्रेम ही युवकांच्या स्वप्नांची प्रेरणा या विषयावर प्रमुख वक्ते अतिरिक्त पोलीस महासंचालक( लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई) चे विश्वास नांगरे पाटील हे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, चित्रपट निर्माते महाभारत मालिकेतील “मै समय हू”हा प्रसिद्ध आवाज ज्यांचा आहे ते हरीश भिमाणी हे आहेत.तर प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध लेखिका व समाज सुधारक डॉ.सौ.सुधाताई कांकरिया,
शनिवार दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी एकता,बंधुता,राष्ट्र प्रेम इस्लामी संस्कृतीचे खरे तत्व या विषयावर प्रमुख वक्ते राष्ट्रीय मुस्लिम मंच अध्यक्ष फैज खान हे आहेत तर प्रमुख पाहुणे खासदार सौ.नवनीत राणा (प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत) हे आहेत. तर प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ अर्थतज्ञ व पतसंस्था चळवळीचे मार्गदर्शक डॉक्टर प्रशांत भालेराव हे आहेत.
या व्याख्यानमालेचे यशस्वीतेसाठी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुधीर पगारिया, मानद सचिव विकास पाथरकर, ज्येष्ठ संचालक मिलिंद गंधे,निलेश लोढा,बाबासाहेब साठे,श्रीमती शैला चंगेडे,व्यवस्थापक निलेश लाटे तसेच पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय तागडे,सचिव बाळासाहेब भुजबळ,कार्याध्यक्ष सुरज अग्रवाल,उपाध्यक्ष अशोक कानडे,अनुराग धूत,सहसचिव राहुल जामगावकर,कोषाध्यक्ष सुखदेव दरेकर,विश्वस्त-
उद्योजक संदेश लोढा,मनीष सोमानी,अनिरुद्ध देवचक्के, राजकुमार जोशी,अजित कृष्णन,कार्यकारणी सदस्य- सुनील पंडित,अनिल जोशी,सीए ज्ञानेश्वर काळे,किशोर जोशी,रणजीत परदेशी, किशोर गांधी,महावीर कांकरिया,संग्राम म्हस्के,नरेंद्र श्रोत्री ,अमोल भांबरकर,शामराव वागस्कर, निलेश चिपाडे कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहे.