सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात..
अहिल्यानगर: एका गांजा प्रकरणात मदत करण्याकरिता लाचेची पाच लाखांची मागणी करत दीड लाखावर तडजोड करत पैसे घेताना रंगेहाथ कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे
(राहणार समर्थ नगर सावेडी) आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेले जेष्ठ नेते अशोक रामचंद्र गायकवाड (वय 71, वर्षे व्यवसाय शेती , राहणार बिशोब लॉइड कॉलनी सावेडी, जिल्हा अहिल्या नगर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेऊन तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेने अहिल्यानगर शहरासह जिल्यात एकच खळबळ आणि चर्चा सुरू आहे. सहायक फौजदार गर्गे गेली अनेक वर्षे नगर शहरात विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असून गुन्हे शोध, गोपनीय शाखेत असल्याने त्यांचा परिचय आणि दबदबा आहे. तर अशोक गायकवाड हे गेली अनेक दशके राजकीय वर्तुळात आहेत. अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत. मोठ्या राजकीय नेत्यांशी त्यांचे घरोब्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. नुकतेच ते राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्याचे बोलले जात असून अजित पवार यांच्याशी हितगुज करताना त्यांचे छायाचित्र आहेत. या परिस्थितीत गर्गे आणि अशोक गायकवाड यांना लाचेच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा गुन्हा की राजीकय डाव की जाणीवपूर्वक गुन्ह्यात अडकवले अशीही चर्चा आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गांजा प्रकरणात आरोपी न करता साक्षीदार करावे या कारणास्तव ही लाच घेतल्याचे एसीबी कडून सांगण्यात आले आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक पोलीस निरीक्षक नेहा तुषार सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
*युनिट – * नाशिक*
*तक्रारदार-* पुरुष, वय 38 वर्षे
*आरोपी* : – १)अशोक रामचंद्र गायकवाड, खाजगी इसम वय 71, वर्षे व्यवसाय शेती , राहणार बिशोब लॉइड कॉलनी सावेडी, जिल्हा अहिल्या नगर.(*खाजगी इसम*)
२) राजेंद्र प्रभाकर गर्गे वय 57 वर्ष सहाय्यक फौजदार कोतवाली पोलीस स्टेशन राहणार समर्थ नगर सावेडी जिल्हा अहिल्यानगर (वर्ग 3)
*लाचेची मागणी-*
5,00,000/- रुपये तडजोडीअंती 1,50,000/- रुपये
*लाच स्वीकारली-*
1,50,000/- रुपये
* *लाचेचे कारण**.
यातील तक्रारदार यांना कोतवाली पोलीस स्टेशन येथे नोंद गांजाच्या केस मध्ये आरोपी न करता साक्षीदार करणेचे मोबदल्यात कोतवाली पोलीस स्टेशनचे राजेंद्र प्रभाकर गर्गे, सहाय्यक फौजदार यांचे करिता मध्यस्थी खाजगी इसम अशोक रामचंद्र गायकवाड यांनी दिनांक २०/०८/२०२५ रोजी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती १,५०,०००/ लाख रुपये लाचेची मागणी केलेली आहे. सदर मागणीस सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी प्रोत्साहन दिल्याचे लाच मागणी कारवाई दरम्यान स्पष्ट झालेले आहे. दिनांक २१/०८/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे लाचेची रक्कम खाजगी इसम अशोक रामचंद्र गायकवाड यांना देणे करिता गेले असता, खाजगी इसम गायकवाड यांनी स्वतः तक्रारदार यांच्याकडून १,५०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारलेली आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
*सापळा अधिकारी*
श्रीमती नेहा तुषार सूर्यवंशी,
पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.नं. ७७७४०११०७८
*तपास अधिकारी*
श्री. अजित त्रिपुटे,
पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर
मो.नं. 8329701344
*सापळा व मदत पथक*
पोलीस हवालदार विनोद चौधरी,चालक पोलीस हवालदार विनोद पवार, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*मार्गदर्शक-
*1) मा. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक*
मो. क्र.8888832146.*
2) *मा. माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक*,
ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मो.क्र.9922266048
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर तहसील