अहिल्यानगर(राजेंद्र त्रिमुखे):
छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस..
नगर तालुक्यात बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड.. सराईत ७ आरोपीं जेरबंद..
पान टपरी चालकाच्या मदतीने नगर तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी
एकुण ८८,२०,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर: नगर तालुका पोलिसांनी ५०० रुपये मूल्याच्या बनावट नोटा तयार करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले असून बनावट नोटा, नोटा तयार करण्याला लागणारी मशिनरी, वाहन जप्त करून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नगर जिल्ह्यासह बीड,छ.संभाजीनगर जिल्ह्यातील असे एकूण आठ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यातील सात आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत शुक्रवारी नगर तालुका पोलिसांनी
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, शहर विभाग पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या उपस्थितीत सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी एका पत्रकार परिषदेत या बनावट नोटा बनवणाऱ्या टोळी बद्दल माहिती दिली. नगर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि प्रल्हाद गिते हे नगर तालुका पोलीस स्टेशन चे हद्दीत पेट्रोलींग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, दोन इसम एक काळ्या रंगाचे महिंद्रा थार गाडीमध्ये फिरत असुन त्यांच्याकडे पाचशे रुपये दराच्या बनावट चलनी नोटा आहेत आणि ते आंबीलवाडी शिवारात प्रत्येक पान टपरीवर देवुन सिगारेट खरेदी करत आहेत. त्यावर सपोनि गिते सो यांनी त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांना बोलावुन घेवुन त्यांचे सोबत आंबीलवाडी शिवारात जावुन खात्री केल्यावर तेथे दोन संशयीत इसम एक महिंद्रा थार गाडीमध्ये फिरताना दिसले. सपोनि गिते आणि पथकातील अंमलदारांनी सदरचे इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) निखील शिवाजी गांगर्डे वय २७ रा. कुंभळी ता कर्जत जि. अहिल्यानगर २) सोमनाथ माणिक शिंदे वय २५ रा. तपोवन रोड जि. अहिलयानगर असे सांगितले. त्यावर त्यांचेकडे सखोल चौकशी करुन गाडीची झडती घेतील असता त्यांचे कब्जात ८०,००० रुययांच्या पाचशे रुपये दराच्या बनावट चलनी नोटा मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन मधे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात असलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहिती नुसार या टोळीत बीड जिल्ह्यातील आरोपी प्रदिप संजय कापरे (वय २८ रा. तिंतरवणी ता. शिरुर कासार जि. बीड) तसेच संभाजीनगर मधुन आरोपी मंगेश पंढरी शिरसाठ (वय ४० रा. शिवाजी नगर ता.जि. छत्रपती संभाजी नगर), विनोद दामोधर अरबट (वय ५३ रा. Asking परिसर ता.जि. छत्रपती संभाजी नगर), आकाश प्रकाश बनसोडे (वय २७ रा. निसर्ग कॉलनी पेठेनगर ता.जि. छत्रपती संभाजी नगर), अनिल सुधाकर पवार (३४ रा. ५६ नंबर गेट मुकुंदनगर ता.जि. छत्रपती संभाजी नगर) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर आरोपी अंबादास रामभाऊ ससाणे (रा. शहर टाकळी ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) हा फरार आहे. निष्पन्न कडून ५९,५०,००० रुययांच्या पाचशे रुपये दराच्या तयार बनावट चलनी नोटा, २,१६,००,००० रुपये चे बनावट नोटा तयार करण्याचे कागद व शाई इत्यादी
प्रकारचे साहित्य, २७,९०,६०० रुपये बनावट नोटा तयार करण्याचे मशिन, संगणक आदी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
सदरची कामगिरी जिल्हा पो.अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या सूचनांनुसार तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोसई भरत धुमाळ तसेच पोहेकॉ सुभाष थोरात, पोहेकॉ रविकिरण सोनटक्के, पोहेकॉ बाबासाहेब खेडकर, पोहेकॉ मंगेश खरमाळे, पोहेकॉ शरद वांदेकर, पोहेकॉ खंड शिंदे, पोकॉसागर मिसाळ, पोकॉ राजु खेडकर, पोकों विक्रांत भालसिंग, पोकों अदिनाथ शिरसाठ, पोकों अन्सार शेख तसेच मपोहेकॉ मोहिनी कर्डक, दक्षिण विभाग मोबईल सेलचे पोकॉ नितीन शिंदे यांचे पथकाने केली आहे.
पान टपरी चालकाच्या सतर्कतेने रॅकेट आले उघडकीस, पोलीस सत्कार करणार:
:नगर तालुक्यातील नगर तालुक्यातील आंबीलवाडी परिसरातील एका पान टपरीवर संशयित दोन इसम वारंवार सिगरेट पाकीट घेण्यास येत होते. यावरून टपरी चालकाचा या इसमांवर संशय आल्याने त्याने तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गीते यांना माहिती दिली. या माहितीवरून तालुका पोलिसांनी पाळत ठेवून आरोपी जेरबंद केले. पान टपरी चालकाची सजगता आणि सतर्कतेने बनावट नोटांचा कारखाना आणि रॅकेट उघडकीस आले असल्याने त्याचा सत्कार करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.