नगर:
शिवजयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी राहात्यात आलेले भाजप युवानेते आणि संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांना विखे समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध केला. ही घटना काल सोमवारी रात्री घडली. शिवजयंती असल्याने विवेक कोल्हे काही स्थानिक समर्थक कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र विखे समर्थकांनी विवेक कोल्हे जाणीवपूर्वक राहात्यात निमित्त साधून येत असून येथील शांतता बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी विखे समर्थकांनी “नामदार राधाकृष्ण विखे पाटील” तसेच “खासदार सुजय दादा विखे पाटील” यांच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा कोल्हे आणि त्यांच्या समर्थकांच्या समोरच दिल्याने काही काळ तणावाची परस्थिती निर्माण झाली होती यावेळी स्थानिक पोलीसही उपस्थित होते. झालेल्या घटनेचे पोलिसांनी चित्रिकरणही केले. विवेक कोल्हे यांनी यानंतर कार्यकर्त्यांसह जाणे पसंत केले.
याबाबत माध्यमांशी बोलताना विवेक कोल्हे यांनी आपली भूमिका मांडली. कोल्हे म्हणाले की, राहता येथील वीरभद्र मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवजयंती निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आणि नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे आराध्य दैवत आहे. मला या ठिकाणाहून आमच्या कार्यकर्त्यांनी आवर्जून बोलवलं होते. श्रद्धा असल्यामुळे मी या ठिकाणी आलो. मात्र या ठिकाणी आल्यावर वीज पुरवठा खंडित केला. तसेच ज्या क्रेन द्वारे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचा होता ती क्रेन वापरू दिली नाही. नगरपालिका ही काही खाजगी प्रॉपर्टी नाही. शिवाजी महाराज खाजगी प्रॉपर्टी नाही, राहात्या मध्येच महाराजांचा पुतळा अनेक वर्ष कोणामुळे डांबून राहिला? यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र आज शिवजयंती आल्याने आनंदाचा दिवस असल्याने आम्ही इथे आलो.
महाराजांना रयतेसाठी संघर्ष करावा लागला तीच प्रेरणा घेऊन मी इथे आलो होतो यापुढेही काम करत राहील. महाराजांची जयंती सर्वांचीआहे, गणेश उत्सवाच्या वेळीही मला या ठिकाणी विरोध करण्यात आला. देव असेल किंवा महापुरुष असेल या जयंती सार्वजनिक असतात आणि त्या सार्वजनिक रित्या साजरा व्हाव्यात. कुठेतरी त्याला व्यक्तिगत स्वरूप कोणी आणू नये. त्यामुळे कुठेतरी दहशतीचा उडालेले झाकण पुन्हा लावण्याचा प्रयत्न सुरू दिसतोय पण हे सर्व महाराजांचे युवा मावळे आहेत. अशा जुलमी कारभारा विरुद्ध आवाज उठवल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या सहकाऱ्यांनी आवाज उठवला त्यांच्यावर हल्ले झाले, असे वारंवार प्रकार होत आहेत. मात्र याचा निर्णय जनतेच्याच कोर्टात होईल. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील अनेक गावे आहेत. आमचे संचालक मंडळ किंवा आमच्या इतर कार्यकर्ते असतील त्यामुळे आम्हाला वाटल्यानंतर किंवा आम्हाला निमंत्रण दिल्यानंतर आपणही या ठिकाणी येऊन उत्सवात सहभागी व्हावं असे वाटलं तर कोणाची पोट दुखी होण्याचं कारण नाही. ते स्वतः अभिवादनाला आले की नाही माहित नाही, पण दुसरं कोणी आलं तर त्यांनी विरोध का करावा? यामध्ये राजकारण का करावं? किमान आज राजांचा दिवस आहे. त्या दिवशी कुणीही राजकारण करू नये अशी अपेक्षा होती मात्र झालेल्या विरोध पाहता हे दुर्दैव असून हा सिविलवाना प्रयत्न आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागत आहे., अशी प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी दिली.
विवेक कोल्हेंच्या आगंतुक येण्याने विखे समर्थक माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ चांगलेच संतापले होते, त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे आहेत. सर्वांनी त्यांची पूजा करावी. मात्र गेल्या काही दिवसांपासून राहाता मतदारसंघांमध्ये काही जण स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी येत आहेत. आम्ही खूप आक्रमक आहोत, राहता शिर्डी मतदारसंघात फार मोठा जनसमुदाय आमच्या सोबत आहे असं कोणाला वाटतं असेल तर तो त्यांचा केविलवाणा हा प्रयत्न आहे. विठ्ठल पवार हे शिर्डी कर्मचारी संस्थेत निवडून आले. मात्र त्यांचा काही जणांनी बोलावले नसताना येऊन सत्कार केला. मात्र विठ्ठल पवार यांनी त्याचवेळी सांगितलं की मी सर्व लोकप्रतिनिधींची मदत घेऊन कर्मचारी सोसायटी चालवणार आहे. मात्र काही जण वारंवार शिर्डीत येऊन वातावरण दूषित करत आहेत. राहाता-शिर्डी मतदारसंघा मधलं शांततेचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुमची 14 गाव जरूर मतदारसंघात असतील. मात्र राहात्यात मतदारसंघात शांतता आहे. विकास कामांमुळे राज्यात नावलौकिक राहात्याचा आहे. यापूर्वी तुम्ही कधी शिवजयंतीला किंवा इतर कार्यक्रमाला आला होता का? मात्र आता जाणीवपूर्वक येथे येऊन शांत वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आम्हाला विखे साहेबांनी कोणत्याही सूचना केलेल्या नव्हत्या, मात्र तुम्ही जो अशांतता करण्याचा प्रयत्न करत आहात. राहत्यात कसलीही दहशत नाही. विनाकारण बिनबुडाचे आरोप कोणी करू नये तुम्ही. तुमचा मतदार संघ सांभाळा. तुमच्या मतदारसंघात काय सुरू आहे ते पहा. मागच्या वेळेस तुम्ही थोड्या मतांनी पडला मात्र यावेळेस विखे पाटील यांच्या नादी लागाळ तर वेळ आल्यावर विखे पाटील काय आहे ते त्यांच्यातील ताकद दाखवतील, असा इशारादिला