ज्ञानराधा मल्टीस्टेट विरोधात ठेवीदार झाले आक्रमक, आमरण उपोषणाचा इशारा देताच संस्थाचालक १० फेब्रुवारीला देणार पहिला टप्पा
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण ):
ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेच्या ठेवीदारांनी जामखेड येथील बंद शाखेसमोर गुरुवारी आंदोलन करून तहसीलदार यांना ५ फेब्रुवारी पर्यंत ठेवी न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी बीड येथील संस्था चालक यांना मोबाईलवर संपर्क केला असता ठेवीदारांना दहा तारखेपर्यंत पहिला टप्पा देण्याचे लेखी पत्र दिले. यामुळे ठेवीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सो. लि जामखेड शाखेसमोर अँड. नितीन राजपुरे, अँड. प्रमोद राऊत व ठेवीदारांनी गुरुवारी आंदोलन करून तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक महीन्यांपासून ज्ञानराधा संस्थेत ठेवीदांचे कोट्यावधी रुपये सेव्हिंग व मुदत ठेव पावतीच्या माध्यमातून ठेवल्या आहेत. मात्र गेल्या चार पाच महीन्यांपासून ज्ञानराधा संस्थेला टाळे लागल्याने गोरगरीब ठेवीदार या संस्थेचे उंबरठे झिजवुन थकले आहेत. तरी देखिल या ठेवीदारांना एक रुपयाही मिळाल नाही. संबधित अधिकार्यांशी संपर्क करत ओहोत परंतु अधिकारी नॉटरीचेबल आहेत. तसेच बीडच्या वरीष्ठ पदावरील अधिकारी यांनी स्वतःचे पैसै काढुन घेतले आहेत. त्यामुळे आमचा बँकेवर विश्वास राहीला नाही. याबाबत दि 5 फेब्रुवारी पर्यंत पैसे मिळाले नाहीत तर तालुक्यातील पिडीत ठेविंदारांसह वकील बांधव व वकील संघ जामखेड यांना घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला होता.
तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मोबाईलवरून ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे पदाधिकारी यांच्याबरोबर संवाद करुन ठेवीदारांना पैसे देण्या बाबत सुचना केल्या. संस्थेचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांनी दि. 10 फेब्रुवारी पासून ठेवीदारांना पहिल्या टप्प्यात काही रक्कम देण्याची कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन मेलवर पत्र पाठवून दिले. तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या मध्यस्थीला यश आल्याने ठेवीदार व वकील संघाने आंदोलनाचा निर्णय मागे घेतला.
