जामखेड मध्ये कारवाई : चार कृषिपंपांसह दुचाकी जप्त
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण ):
शेतातील पाणी उपसा करण्याचे सिंचन पंप चोरी करणारी टोळी मुद्देमालासह खर्डा पोलीस स्टेशन कडुन जेरबंद 3 आरोपी अटक एकुण 4 मोटर्स (सिंचन पंप), मोटार सायकल सह 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चोरीचे गुन्हे उघडकिस आणले .
खर्डा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतक-याच्या शेतातील पाणी उपसा सिंचन पंप चोरी गेले बाबत तक्रार प्राप्त झाल्याने खर्डा पोलीस स्टेशन येथे चोरीचे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा मा.वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशन प्रभारी म्हणुन नव्याने हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड , पोहेकाँ संभाजी शेंडे, पोकाँ शशी म्हस्के , अशोक बडे, धनराज बिराजदार, विष्णु आवारे, धनवडे, शाम चखाले, पोकाँ गणेश बडे असे पथक तपास करत असताना पोहेकाँ संभाजी शेंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदरचा गुन्ह्यात अटक केलेले आरोपी हुसेन उर्फ सद्दाम नशीर शेख (वय 26 वर्ष, रा सोनेगाव ता जामखेड), सुनिल उर्फ सोन्या समाधान जाधव (वय 23वर्ष) व विश्वनाथ उर्फ ईश्वर दिगांबर ढाळे (वय 27 वर्ष दोघे रा तरडगाव ता जामखेड) यांनी केलेला .
सदर बातमीच्या अनुशंगाने नमुद आरोपींचा शोध घेवुण त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन तपास केला असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली देवुन दाखल गुन्हयात चोरीस गेलेल्या सिंचन पंपासह ईतर तीन पाणी उपसा करणा-या मोटर चोरले बाबत कबुली दिल्याने दाखल गुन्हयातील तपासामध्ये आरोपी कडुन एकुण ४ पानबुडी मोटार व 1 मोटारसायकल असा एकुण 79000/- हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कबुली जबाब मध्ये चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीवर आंबी पोलीस ठाणे ता.भुम जिल्हा धाराशीव चोरीचा असुन नमुद आरोपी कडुन विविध गुन्हे उघडकिस आणलेले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अहमदनगर राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत विवेकानंद वाखारे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या पथकाने केली.