कर्जत:
कर्जत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणूक २०२४- २०२९ या कालावधी करिता जाहीर झाली होती. विविध मतदार संघातून एकूण ३६ अर्ज दाखल करणेत आले होते ते सर्व मंजूर करणेत आले होते.
या संस्थेत मुख्यतः चेडे कुटुंबियांचे प्राबल्य आहे. संस्थेची एकूण अवस्था पाहता संस्थेला उर्जितावस्था येणे गरजेचे होते.अशा विचारातून आ.राम शिंदे यांनी या संस्थेच्या निवडणुकीमध्ये लक्ष घातले. प्रकाश चेडे व त्यांच्या सहकार्यांनी आ.प्रा.राम शिंदे नेतृत्व मान्य करून निवडीचे सर्वाधिकार त्यानांच देण्यात आले होते.
त्याप्रमाणे आ.प्रा.राम शिंदे यांनी उमेदवारांची निवड जाहीर करुन बाकी अर्जदारांनी अर्ज माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. सर्व अर्जदारांनी आ.राम शिंदे साहेब यांच्या आवाहनास प्रतिसाद देत अर्ज माघारी घेऊन संस्था बिनविरोध करणेत सहकार्य केले.
या संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रामुख्याने अ.नगर बँकेचे संचालक काकासाहेब तापकीर (सभापती कृषी उत्पन बाजार समिती कर्जत) अंबादासजी पिसाळ (जिल्हा सहकारी बँक) डॉ.श्री.ए.बी.चेडे (माजी चेअरमन ख.वि.संघ कर्जत) शेखर खरमरे (तालुकाध्यक्ष,भाजपा कर्जत), श्री.अशोक खेडकर (जेष्ठ नेते भाजपा) लहुजी वतारे (संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती कर्जत ),मंगेश (दादा) जगताप,(संचालक,कृषी उत्पन बाजार समिती कर्जत) डॉ.श्री.सुनिल गावडे (उपाध्यक्ष,अ.नगर जिल्हा भाजपा) नितीन खेतमाळस (सरपंच,मिरजगाव ) संपत बावडकर व डॉ.विजय हजारे सर्व अर्जदार यांचे सहकार्य लाभले.
कर्जत तालुका खरेदी विक्री संघ ही संस्था पुन्हा उर्जितावस्थेत आणून या संस्थेचे वैभव वैभव पुन्हा प्राप्त करुण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अलीकडील काळामध्ये काही लोक प्रतिनिधींनी खाजगी मालकी संस्था नामनिर्देशित करुन कर्जत तालुक्यातील सहकारी संस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत परंतु सहकारी संस्था मोडीत काढण्याचे त्यांचे कुटील कारस्थान मी यशस्वी होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया आ.प्रा.राम शिंदे यांनी दिली.यावेळी त्यांनी सर्व अर्ज माघार घेउन सहकार्य करणाऱ्या अर्जदारांचे आभार मानले.तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. असे प्रसिद्धी पत्रकात श्री.शेखर खरमरे तालुकाध्यक्ष यांनी म्हटले आहे. यावेळी भाजप दक्षिण सरचिटणीस सचिन पोटरे उपस्थित होते.