जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जिल्ह्यातील राहुरी गावातील वकील राजाराम आढाव व वकील मनीषा आढाव या दांपत्याचे अपहरण करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. या घटनेचा जामखेड तालुका वकिल संघाकडून तीव्र निषेध नोंदविला.व या घटनेच्या निषेधार्थ वकील संघाने 3 फेब्रुवारी पर्यंत कोर्टातील कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे . वकील संघटने कडून पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.वकिलांसाठी संरक्षण कायद्याची तरतूद करावी, अशी आग्रही मागणीही बार असोसिएशनने केली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, न्यायालयातील वकील हे पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी परिश्रम घेत असतो. यावेळी काम करत असताना अनेकदा विरुद्ध बाजूच्या पक्षकारांकडून धमक्या मिळतात. त्यामुळे देखील आम्ही कोणतीही भीतीने वाळगता वकिली व्यवसाय करत असतो. २५ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव या दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.निंदनीय घटनेमुळे महाराष्ट्रातील वकील वर्ग हादरला आहे. न्यायव्यवस्थेसाठी ही घटना चिंताजनक आहे.या प्रकरणी पोलिसांनी गतीने तपास करावा. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी येथे झाली. तसेच वकील संरक्षण कायदा देखील मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी जामखेड वकील संघाच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वकिल संघाचे अध्यक्ष शेख अब्दुल कादर. उपाध्यक्ष नितीन घुमरे. सचिव कृष्णा शिरोळे अॅड संग्राम पोले. हर्षल डोके. अॅड पी व्ही गोले अॅड पी के राऊत अॅड रुपाली इंगोले. अॅड मुरुमकर अॅड जायभाय अॅड थोरात अॅड बोरा. अॅड घोडेस्वार अॅड बोरा अॅड पाटील अॅड नागरगोजे अॅड ससाणे अॅड शेख अॅड गायकवाड अॅड राजापुरे अॅड सय्यद अॅड वाळुंजकर अॅड कोरे. अॅड डुचे. अॅड पठान अॅड वारे अदिसह वकिल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते