नगर:
जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्राद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.सत्यजित तांबे यांनी दोन महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. राहुरी न्यायालयात वकिली करणारे मानोरी येथील ऍड.राजाराम जयवंत आढाव(वय 52) आणि ऍड.मनीषा राजाराम आढाव(वय 42) या वकील दांपत्याची गेल्या आठवड्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी राज्यातील वकील आक्रमक झाले असून मोर्चे-आंदोलने करत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील वकिलांनी 3 फेब्रुवारी पर्यंत कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. या पार्श्वभूमीवर आ.तांबे यांनी वकिलांसह जनभावना लक्षात घेऊन खालील दोन महत्वाच्या मागण्या सरकारकडे केल्या आहेत.
1. सदर दुहेरी हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी.
2. राज्यातील वकिलांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाचा प्रलंबित ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेल्फेअर ॲक्ट येत्या अधिवेशनात पारित करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी.
– सत्यजीत तांबे
सदस्य, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य
https://twitter.com/satyajeettambe/status/1752661042877120952?t=fTHpMEIEg2HaYDzDT8rWdA&s=19