Latest news
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का ना... पूरग्रस्त परिस्थितीत डंका विखेंचाच!! अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड
12.7 C
New York
Thursday, October 9, 2025

विविध शिक्षक संघटना आणि प्रतिनिधींचा अपक्ष विवेक कोल्हेंना पाठिंबा जाहीर..

विवेक कोल्हे यांना मिळणारा मोठा पाठिंबा विजयाची नांदी

अहमदनगर येथे विविध शिक्षक संघटना आणि प्रतिनिधी यांनी केला पाठिंबा जाहीर

नगर:
नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक बिपीनदादा कोल्हे यांना पाठिंबा देण्यासाठी शिक्षक संघटनांची मोठा ओघ सुरू झाला आहे.टी डी एफ अहमदनगर आणि अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,महानगर टी डी एफ आणि माध्यमिक शिक्षक संघटना,क्रीडा संघटना,रयत सेवक संघ व इतर अन्य संघटनाचे प्रतिनिधी यांनी उपस्थिती राहून विवेक कोल्हे यांना पाठिंबा दिला आहे.विजयी होईल असा प्रबळ उमेदवार आम्हाला हवा आहे या मुळे आम्ही भूमिका घेतो आहोत असे पदाधिकारी यांनी जाहीर केले.

- Advertisement -

विवेक कोल्हे यांना पाचही जिल्ह्यात मोठा पाठिंबा..
-विवेक कोल्हे यांना पाचही जिल्ह्यात वाढता प्रतिसाद हा विरोधी उमेदवार स्पर्धेत मागे पाडण्यात यशस्वी झाला आहे.अतिशय अभ्यासू आणि होतकरू असा उमेदवार लाभला आहे.सर्वांनी मिळून आम्ही हा निर्णय घेतो आहोत की आमचा संघटनेने दिलेला उमेदवार हा जर विजयी होऊ शकत नाही तर आम्ही ज्यांच्या कुटुंबाने कायम टी डी एफला मदत केली आहे.स्व.शंकरराव कोल्हे यांच्या योगदानाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.विवेक कोल्हे यांना पाठबळ देण्यात येण्याची गरज आहे अशी भूमिका राजेंद्र लांडे यांनी बोलताना स्पष्ट केली आहे.

विवेक भैय्यांमध्ये डॉ.सुधीर तांबें सारखे कार्यकर्तृत्वाची झलक!!
-शिक्षकांचे प्रश्न सुटण्यासाठी होतकरू तरुण हवा आहे.केवळ नावाला उमेदवारी करणारे प्रतिनिधी आम्हाला नको आहे तर ज्यांना शिक्षक हित डोळ्यासमोर आहे त्यांना साथ देऊन परिस्थितीत बदल केला पाहिजे.डॉ.सुधीर तांबे साहेब यांच्या प्रमाणे विवेक कोल्हे यांच्या सारखे नेतृत्व लाभते आहे.राज्य टी डी एफचा उमेदवार सक्रिय नाही मात्र विवेक कोल्हे हे आपल्या विचारांचा आदर ठेवणारे उमेदवार आहेत.

- Advertisement -

टीडीएफचे नवल यांच्याकडून कौतुक..
-माजी जिल्हाध्यक्ष टी डी एफ अशोकराव नवल यांनी विवेक कोल्हे यांच्या कार्याचे कौतुक केले.ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव ढाळे यांनी शिक्षक मतदारसंघाचं संबंध इतिहास सांगून अभ्यासू मनोगत व्यक्त केले.अनेकांनी आमचेच उमेदवार पाडले.आम्ही पाचही जिल्ह्यात आढावा घेतला त्यातून विवेक कोल्हे यांच्यासारखा एकच उमेदवार सर्वत्र मान्य झाल्याचे आम्हाला आढळून आले.आबासाहेब कोकाटे यांनी स्व.शंकरराव कोल्हे यांनी तत्कालीन टी डी एफ उमेदवार राजेंद्र लांडे यांच्या प्रचारात कसे सक्रिय होते हे सांगून विवेक कोल्हे देखील सक्षम उमेदवार आहेत.

रयत परिवारात स्व.कोल्हे यांचे मोठे योगदान..
-जिल्हाध्यक्ष मधुकर पवार यांनी सर्वांच्या संमतीने विवेक कोल्हे यांना पाठींबा जाहीर केला आहे.आम्ही सर्वांनी मिळून एकत्रित हा निर्णय झाला आहे.रयत परिवारात देखील स्व.शंकरराव कोल्हे यांचे मोठे काम होते त्यामुळे हा परिवार समाजाला आपलासा वाटणारा आहे.हा जगन्नाथाचा रथ प्रथम पसंती क्रमाने आपण ओढून आणणार आहे.

सर्वांचा विश्वास सार्थ ठरवणार -विवेक कोल्हे
-शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर प्रत्यक्ष या निवडणुकीत पुढे येऊन संघटनेचा विचार पुढे घेऊन जाण्याचा मनोदय या निमित्ताने मला उर्जा देणारा आहे.मला पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटना आणि त्यांचे पदाधिकारी यांचा विश्वास मी सार्थ ठरवणार आहे.मला या निमित्ताने शंभर हत्तीचे बळ मिळावे अशा उक्तीप्रमाणे प्रत्यय येतो आहे. स्व.कोल्हे साहेब यांच्यावर दाखवलेले प्रेम या निवडणुकीतील मला मिळालेला ठेवा आहे.आजवर स्पर्धा होती पण आजच्या पाठिंब्याने मी प्रथम स्थानी आलोय याची खात्री पटली आहे असे विवेक कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

यावेळी आबासाहेब कोकाटे,मधुकर पवार,शिवाजीराव ढाळे,राजेंद्र लांडे,अशोकराव नवल,सुधीर काळे,शिरीष टेकाडे,रमजान हवालदार,सोनवणे सर,रासकर सर,वाकचौरे सर,गजानन शेटे,सुरेश बोळीज,दिलीप ढवळे,सोमनाथ सुंबे,भगवान मडके,संजय निक्रड,नानासाहेब सुद्रिक,जगन्नाथ आढाव,उध्दव गुंड,देशमुख सर,कळसकर सर आदींसह विविध शिक्षक संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा