नगर:
तायक्वांदो खेळ प्रकारात महत्वाचे योगदान दिलेले नामदेव शिरगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले जात आहे. अशी माहिती छत्रपती तायक्वांदो अकॅडमी, अहिल्यानगर व छत्रपती ट्रेडर्सचे नारायण कराळे यांनी दिली आहे.
नामदेव शिरगांवकर सरांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना कराळे म्हणाले की, ते एक अतिशय हुशार ,प्रेमळ व्यक्तिमत्व आहे.त्यांनी तायक्वांदो मध्ये केलेले बदल अमुलाग्र आहेत. त्यांनी सेन्सर सिस्टीम चालू केली.
शिरगांवकर यांनी भारतीय तायक्वांदो मध्ये केलेल्या बदलामुळे अनेक जागतिक स्पर्धेत भारताला मेडल्स मिळाले आहेत. तायक्वांदो परिवाराकडून नामदेव शिरगांवकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कराळे यांनी देत त्यांना त्यांचे भावी आयुष्य सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो अशी प्रार्थना ईश्वरचरणी व्यक्त केली आहे.