Latest news
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का ना... पूरग्रस्त परिस्थितीत डंका विखेंचाच!! अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड
14.2 C
New York
Thursday, October 9, 2025

“पॅलेसस्टाईनचा झेंडा” प्रकरणी खरे सूत्रधार शोधण्याची आवश्यकता..-ना.विखे

रमजान ईदचा सण उत्साहात साजरा होत असताना काही अपप्रवृत्तीं कडून गालबोट लावण्याचा प्रयत्न

काही राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यातच फुटरतावादी वृत्तीला प्रोत्साहन!! ना.विखेंचा आरोप

नगर:
रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडविण्यात आल्याची घटना अतिशय गंभीर असून, या प्रकाराची सखोल चौकशी करुन, घटनेमागील खरे सुत्रधार पोलिसांनी शोधून काढण्याची आवश्यकता असल्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

मंत्री ‍विखे पाटील  यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करुन राज्यात व जिल्हयात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा होत असताना काही अपप्रवृत्तीनी गालबोट लावण्याच्या हेतूने प्रार्थनेच्या दरम्यान पॅलेस्टाईनचा झेंडा फडविला. ही अतिशय गंभीर बाब आहे. या बाबत  पोलिसांनी तातडीने दखल घेवून गुन्हा दाखल केला असला तरी, या घटनेमागील खरे सुत्राधार शोधून काढणे अतिशय गरजेचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

या गंभीर घटनेच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा न करता पोलीस प्रशासनाने झेंडा फडकवीणारे आणि त्यांना पाठबळ देणारे सुत्रधार कोण आहेत याची कसून चौकशी करावी. कारण अशी देशद्रोही वृत्ती कार्यरत असेल तर, प्रशासनाने ती मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे. अशा देशद्रोही वृत्तीला कोणीही आश्रय देण्याची चुक करु नये असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

- Advertisement -

दुर्दैवाने काही राजकीय पक्ष आपल्या जाहिरनाम्यातच फुटरतावादी वृत्तीला प्रोत्साहन देत आहे. पण अशा घडणा-या घटनांमधून आत्मरिक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे मत ना.विखे पाटील यांनी शेवटी व्यक्‍त केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा