काळाची गरज असलेल्या “सायबर पोलीस स्टेशन”ला स्वतंत्र अधिकारी का नाही..
विस्ताराने मोठ्या जिल्ह्यात स्थागुशा’ला एकच पोलीस निरीक्षक!!
नियंत्रण शाखेतील अधिकाऱ्यांचे काय!!
माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी उपस्थित केले जिल्हा पोलीस दलातील कळीचे मुद्दे!!
नगर:
दि.०३/०४/२०२३ च्या आदेशान्वये पो.नि. आहेर यांची सायबर पोलीस ठाणे अहमदनगर येथे पोलीस निरीक्षक पदावरुनस्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे नवीन नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतु त्यांच्याकडे सायबर पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कामकाज सुध्दा देण्यात आलेले आहे. सदर ची बाब संयुक्तीक नसून त्याचे कारण सायबर पोलीस ठाणे येथे स्वतत्र पोलीस निरिक्षक पद मंजुर असताना त्या ठिकाणी नवीन अधिकारीची नेमणूककरण्यात आलेले नाही. पोलीस निरीक्षक दर्जाचे अनेक पोलीस निरीक्षक पोलीस नियंत्रण कक्ष उपलब्धअसताना किंवा इतर अतिरिक्त पोलीस निरीक्षक उपलब्ध असून हि नवीन अधिकारीची नेमणूक न करता आहेर यांच्या कडे गेल्या १ वर्षापासून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर च्या आस्थापना सुचिवर २ पोलीस निरीक्षक पद मंजुर असताना १ पोलीस निरीक्षक पद भरण्यात आलेले आहे.सदरचे पद भरण्याबाबत शेख यांनी दि.२२/०८/२०२१ पासून पाठपुरावा करीत आहे. परंतु आज पर्यंत त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली नाही. अहमदनगर जिल्हा हे क्षेत्रफळामध्ये मोठा असून सदर जिल्हयामध्ये एकूण १४ तालुके आहे. ७ महसूल विभाग आहे. या बाबी विचार करता २ पोलीस निरीक्षकनेमणूक करणे आवश्यक असताना ते नेमणूक करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर अनेक कर्मचारी हे सायबर
पोलीस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखेत येथे नेमणूक नसताना कामाच्या सोयीसाठी त्या कर्मचारींना सायबर पोलीस ठाणे येथे तपासकामी तात्पुरत्या स्वरुपात सलग्न नेमणूक करण्यात आलेली आहे. तत्पुरती बदली हेमहाराष्ट्र पोलीस सुधारणा अध्यादेश २०१४ व २०१५ च्या तरतुदी प्रमाणे तत्पुरती बदली चा एक भाग आहे.अशी नेमणूक करावयाची असल्यास वरीष्ठ पोलीस आस्थापना मंडळाची पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.तशी परवानगी न घेता पोलीस अधीक्षक यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात सदर नेमणूक केलेली आहे. सदरची बाब हि नियमाच्या विरोधात आहे. त्याबाबत शेख यांनी पोलीस महासंचालक. विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती व स्थानिक गुन्हे शाखेत अजून एक पोलीस निरीक्षक नेमणूक करावी, सायबर पोलीस ठाण्यामध्येही स्वातंत्र्य पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात यावी, आहेर यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यास कसूर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात शिस्तभागाची कारवाई करण्याची मागणी आरटीआय आणि सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांच्याकडून करण्यात आली होती.