कामोठ्याचे रणांगण ठरणार कळीचा मुद्दा!!
नगर:
रविवारी नवी मुंबईतील कामोठा इथे महायुतीतिल भाजपचे उमेदवार खा.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातील अनेकजण नोकरी-काम-धंद्याच्या निमित्ताने या परिसरात स्थायिक झाली आहेत. मात्र असे असले तरी या हजारोच्या संख्येने असलेल्या नागरिकांची नाळ पारनेरच्या मायभूमीशी पक्की जोडलेली नेहमीच दिसून येते. साहजिकच सध्या लोकसभा निवडणुकीचा फिवर वाढत असताना कामोठा परिसरातील नागरिक विशेष करून मतदाता हा जिल्ह्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.
अशात पारनेर नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी तसेच प्रशांत ठाकूर यांनी रविवारी 7 एप्रिल रोजी सायंकाळी भव्य अशा दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमास महायुतीचे भाजपचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. कामोठे परिसरात डॉ सुजय विखे पाटील यांचे स्वागताचे मोठमोठाले होर्डिंग-बॅनर अनेक ठिकाणी झळकले आहेत. सोशल माध्यमातून कामोठ्यात होणाऱ्या कार्यक्रमाची मोठी चर्चा नवी मुंबई,कल्याण सह पारनेर तालुक्यात असून या कार्यक्रमाकडे अनेकांचे औत्सुक्यपूर्ण लक्ष आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या कडे देण्यात आले आहे. सायंकाळी एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतानाच त्याच वेळी शाही मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवकालीन वातावरण निर्मिती साठी हत्ती,घोडे,उंट यासह महाराष्ट्रातील पारंपरिक लेझीम,झांज पथक आदी असणार आहे. यानंतर होणाऱ्या मनोगत कार्यक्रमात अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून अनेक बिनीचे शिलेदार या कार्यक्रमास उपस्थिती लावणार असल्याने कामोठ्याचा रविवारी होणारा कार्यक्रम कळीचा मुद्दा ठरणार असे बोलले जात आहे.