नगर:
नगर येथील माऊली सभागृह येथे शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे, शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे, महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शिवसेनेच्या स्थानिक महिला नेत्या शबनम इनामदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराचा बिगुल वाजला असून सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की,मी तुम्हाला फक्त विकास आणि विकासच देऊ शकतो!. आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत. यामुळे जिल्ह्याचा विकास हेच माझे एकमेव लक्ष असून ते मी अविरत करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात देशाच्या प्रगतीचा उल्लेख करत सदरची निवडणुक ही व्यक्तीची निवडणुक नसुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठीची निवडणुक आहे. यामुळे सर्वांनी आपले मदभेद विसरून महायुतीच्या कामाला लागावे असे आवाहन केले.