नगर:
नगर जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील परिवाराचे ५० वर्षापासूनचे मोठे योगदान आहे. म्हणुन त्यांची चौथी पिढी आज सत्तेत आहे. विकासाची परंपरा असेलेले सुजय विखे पाटील हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार म्हणुन मैदानात आहेत. त्यांच्या नावातच “जय” आहे, यामुळे त्यांचा “विजय” नक्की आहे. असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. ते नगर येथील शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते.
नगर येथील माऊली सभागृह येथे शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे, शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे, महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शिवसेनेच्या स्थानिक महिला नेत्या शबनम इनामदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय नक्की असून, सदरची निवडणुक ही व्यक्तीची निवडणुक नसुन विचाराची निवडणुक आहे. यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने महायुतीच्या उमेदवाला निवडून आणण्यासाठी मतभेत विसरून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे असे शिंदे म्हणाले. शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार करत असल्याचे सांगितले. तरमंत्री दादासाहेब भुसे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, सदरची निवडणुक ही महाराष्ट्र आणि देशासाठी महत्वाची आहे.प्रत्येक उमेदवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करणार आहे. यामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांना निवडून आणण्यासाठी रात्रं दिवसं काम करा. अशा सुचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच यावेळी सुजय विखे पाटील यांना निवडून आणताना शिवसेनेचा सिंहाचा वाटा असणार असे आश्वासन दिले.