Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
20.3 C
New York
Monday, August 25, 2025

पाथर्डीत ठेकेदारांची भाईगिरी! लोकप्रतिनिधींचे अभय!! ढाकणेंचा आरोप..

ठेकेदारीच्या कारणावरून एकाच पक्षाशी निगडित असलेल्या ठवकेदाराला दुसऱ्या गटाच्या ठेकेदार टोळीकडून मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न!! पाथर्डीत चाललंय काय?? गुंड-दहशतखोर ठेकेदारांना लोकप्रतिनिधीचे अभय! प्रताप ढाकणे यांचा सूचक आरोप!!

भर बाजारपेठेतून लाठ्या काठ्यांनी जाऊन
उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नवीन ठेकेदारावर हल्ला करण्याचा दुसऱ्या ठेकेदार टोळीकडून प्रयत्न!! इतर रूग्णही भयभीत..पोलीस आल्याने अनर्थ टळला..

पाथर्डी(प्रतिनिधी सोमनाथ बोरुडे):
ठेकेदारीच्या वादातून एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आणि त्याच पक्षाच्या संलग्न असलेल्या ठेकेदारांमध्ये  शाब्दिक चकमक होऊन तुफान हाणामारी झाली.
यात तरूण ठेकेदार किरकोळ जखमी झाला. व  उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेला असता दुसऱ्या गटातील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या टोळीने लाठ्याकाठ्यासह चाळीस ते पन्नास जनांच्या जमावाने भर बाजारपेठेतून दहशत माजवत जात उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट समोर जमावाने धावा बोलला. यावेळी लाठ्याकाठ्यासह दहशत निर्माण केली गेली. त्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठे भितीचे वातावरण पसरले तर रुग्णालयातत उपचार घेणारे सर्वच रुग्ण हवालदिल झाले. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला.

- Advertisement -


या बाबत पोलीसांनी ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी असे मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) नेते ॲड प्रताप ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

ढाकणे यांच्या मागणी नंतर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी याच टोळीने भर बाजारपेठेत एका पक्षाचे पदाधिकारी असलेल्या व्यापाऱ्यास त्यांच्या दुकानात घुसून मारहाण केली होती. यावेळी मोठे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले होते.

अधिक माहिती अशी की शहरातील शेवगाव रोड जुन्या बसस्थानक ते जॉगिंग पार्क पर्यंत गटारीचे कामाचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन होण्याच्या अगोदरच या ठिकाणी ठेकेदार असलेले कार्यकर्ते आणि त्याच पक्षाशी निगडित असलेल्या तरूण ठेकेदारात शाब्दिक चकमक उडाली. त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. उपस्थित पालिकेचे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी  तरूण ठेकेदार किरकोळ जखमी झाला. यानंतर जखमी ठेकेसारने  पोलीस स्टेशन गाठले व घडलेली हकीगत पोलिसांना सांगितली. यानंतर पोलिसांनी त्याला पुढील औषध उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांच्या टोळीतील चाळीस ते पन्नास जनांच्या जमावाने लाठ्याकाठ्यासह तरूण ठेकेदारीच्या घरी जाऊन त्याला बाहेर बोलवा मी कोण आहे हे दाखवतो असे म्हणत घरी असलेल्या नातेवाईकांना शिवीगाळ करून धमकावले असे सांगितले जात आहे.
तो घरी नसल्याचे समजल्यानंतर मारहाण केलेल्या ठेकेदार टोळीने तरुण ठेकेदार उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजताच भर बाजारपेठेतून लाठ्याकाठ्या हातात घेऊन एखाद्या सिने स्टाईल आपला मोर्चा उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने वळवला. जखमी तरुण ठेकेदार हॉस्पिटल मध्ये उपचार  घेत होता. त्याच वेळी भला मोठा जमाव लाठ्याकाठ्या हातात घेऊन हॉस्पिटलच्या गेट समोर आला व मोठमोठ्याने गेट समोर आरडाओरडा करून शिवीगाळ करु लागल्याने रुग्णालयातील उपस्थित रुग्णांसह एकच गोंधळ उडाला व रुग्णाणमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
ही बाब येथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच  कर्मचाऱ्यांनी तत्काळ हॉस्पिटलचे गेट बंद केले. यावेळी  40 ते 50 जनांच्या जमाव हॉस्पिटलच्या गेटच्या दिशेने धावला व तिथेच लाठ्या-काठ्या भिरकवत रुग्णालयाला घेरावा घालून हॉस्पिटलवर हल्ल्याचा प्रयत्न केला. याची माहिती बाजारपेठेत वाऱ्यासारखी पसरली व काही व्यापाऱ्यांनी घाबरून जाऊन आपली दुकाने देखील बंद केली. त्यामुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले होते. काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी आल्याच्या नंतर रुग्णालय परिसरात दहशत पसरविणाऱ्या टोळीने त्या ठिकाणाहून पळ काढला.

- Advertisement -

त्यानंतर त्या तरुण ठेकेदाराला पोलीस बंदोबस्तात पोलीस ठाण्यात आणण्यात आले.  रीतसर पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असताना एका पालिकेच्या माजी पदाधिकाऱ्याने येऊन घडलेल्या प्रकाराबाबत माफीनामा देऊन मध्यस्थी केल्याने प्रकरण तात्पुरते थांबविले. मात्र या घडलेल्या प्रकरणाबाबत पाथर्डी शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. पाथर्डीचे बिहार झाले आहे अशीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

निवडणुकीच्या तोंडावर सत्तेतील कार्यकर्तांचा एवढ्या मोठा जमाव व लाठ्या काठ्या घेऊन जर भर बाजारपेठेतून एखाद्या कुटुंबावर हल्ला करण्यासाठी साठी जात असेल तर  ही बाब गंभीर आहे. नेमके यांना कुणाचे अभय आहे. अशी चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी लोकप्रतिनिधीने गुंडगिरी करणाऱ्यांना पाठीशी घालू नये असे म्हणत सूचक अंगुलीनिर्देश केला आहे. याबाबत पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. असे राष्ट्रवादीचे नेते ॲड प्रताप ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा