नगर:
संगमनेर येथील अमृतवाहिनी बँकेचा माजी अध्यक्ष असलेला अमित पंडित याला नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असल्याने काल अटक झाल्याने संगमनेरात एकच खळबळ उडाली. अमित पंडितचे जेष्ठ काँग्रेस नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी निकटचे संबंध असल्याची चर्चा आहे. नगर अर्बन बँक घोटाळ्यात तब्बल105 आरोपी आहेत. मोजके आरोपी अटक झाले असून अनेक आरोपी फरार अथवा लपून-छपून वास्तव करत आहे. अमित पंडितची अटक कशी झाली याबाबत नगर अर्बन बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी याबाबत एक पोस्ट प्रसिद्ध झाली असून ती चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये “112 नंबरला फोन गेला आणि कार्यक्रम झाला तर??? ये डर जरूरी है। ” असे सांगत अधिकची माहिती दिली आहे.
काय आहे राजेंद्र गांधी यांची पोस्ट..
“दोन दिवसापुर्वी केले आवाहन फायदा लगेचच नगर अर्बन बँकेत 291 कोटी रूपयांचा महाघोटाळा करून बँक बुडावायला कारणीभूत झालेल्या 105 आरोपी पैकी जवळपास 90 आरोपी अद्याप फरार आहेत
105 आरोपींची गोपनीय यादी लिक झालेमुळे आरोपींना फरार होणेस मदत झाली असली तरी दुसरे बाजूला सर्व जनतेला ही नावे कळले मुळे कोणी फरार आरोपी कोणाला दिसल्यास 112 नंबर वर कॉल करून पोलीसांना खबर देणे सोपे झाले व याप्रमाणे बँक बचाव समितीने सोशल मिडीयावर आवाहन देखील केले होते
दि 16/03/2024 रोजी बँकेला फसविणारा मोठा कर्जदार अमित पंडीत याला अटक झाली. संगमनेर येथे एका लग्न समारंभात अमित पंडीत आला असलेची खबर देणारे अनेक फोन 112 नंबरला गेले व आरोपीला पकडणे शक्य झाले. असेच आता इतर फरार आरोपींचे बाबतीत होणार यात शंका नाही आरोपींचे मालमत्ता जप्त करणेचे कामाला वेग आला आहे. या साठी आर्थिक गुन्हे शाखेत काही अधिकारी नव्याने वाढविणेत आले आहेत जिल्हा पोलीस अधिक्षक श्री राकेशजी ओला,अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री प्रशांतजी खैरे व आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळणारे उपअधिक्षक श्री अमोलजी भारती साहेब यांनी आता कंबर कसली आहे व तपासाचे प्रगतीला वेग देणे बरोबर दाखल गुन्हेला भादवि कलम 120(B) व एमपीआईडी चे कलम 4 वाढविणेत आले आहे त्यामुळे आता फरार आरोपी भोवतीचा फास चांगलाच आवळला गेला आहे. तसेच फॉरेंसिक ऑडीटर कडून सुधारित रिपोर्ट घेवून काही आरोपींची नांवे आणखी वाढली जातील अशी चिन्हे आहेत माननीय जिल्हा न्यायाधीशांनी दिलेल्या आदर्श न्यायनिवाड्यात माननीय सुप्रीम कोर्टाचे निकालाचा संदर्भ देत जनतेचे कष्टाचे पैशाचा अपहार करणारे आरोपी ना कुठलिही दया माया न दाखविता कठोर पणे वागणूक देणेचे सूतोवाच केलेले आहे . एकदंरीतच नगर अर्बन बँकेचे तपासाचे वातावरणात फिल गुड ची जाणीव होत आहे. कारवाई चा धसका घेतलेले अनेक कर्जदार आता स्वतः होवून संपर्क करत आहेत. या कर्जदाराशी संगनमत करणारे व ठेवीदारांना खोट्या थापा मारणारे बदमाश संचालकांनाच आता तोंडे चुकवावी लागत आहेत. त्यामुळे कर्जदारांना आता कळून चुकले आहे की बँकेचे पैसे परत करणे शिवाय काहीच गत्यंतर नाही 112 नंबरला फोन गेला आणि कार्यक्रम झाला तर???
ये डर जरूरी है।
राजेंद्र गांधी
बँक बचाव समिति