Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
8.6 C
New York
Tuesday, October 20, 2026

उमेदवारीचा संघर्ष..मनधरणी आणि सुजय यांची विजयश्री!!आता पुन्हा 2024 ला..

नगर:
केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात राजकीय दरारा.. आणि कधी वेळ पडली तर दिल्ली दरबारी पण असलेले वजन, अशीच ओळख विखे कुटुंबाने गेली अनेक वर्षे जपली आहे. मात्र मोठा वकुब असलेल्या विखे परिवाराला संघर्षही अटळ राहिला आहे.

2019 ला राधाकृष्ण विखे यांनी आपले पुत्र डॉ सुजय विखे यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उतरवण्याचे ठरवले. मात्र आघाडीत ही जागा काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस कडे होती. राधाकृष्ण विखे यांनी अनेक प्रयत्न करूनही शरद पवार यांनी सुजय विखे यांना उमेदवारी दिली नाहीच, अखेर विखे परिवाराने राजकीय धाडसी निर्णय घेत सुजय यांना भारतिय जनता पक्षाकडून उमेदवारी पदरात पाडून घेतलीच.

आता विषय होता तो तत्कालीन विद्यमान खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या नाराजीचा. हक्काची उमेदवारी गेल्याने गांधी पिता-पुत्र नाराज झाले, मात्र त्यावेळी राधाकृष्ण विखे यांनी दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांची नाराजी दूर केली. त्यानंतर सुजय विखे यांनीही दिलीप गांधी, सुवेंद्र गांधी यांची भेट घेतली.. नाराजीचे मळभ दूर झाले आणि गांधी पिता-पुत्रांनी सुजय यांच्या प्रचारात सहभाग घेतला. विविध कारणांनी लक्षवेधी ठरलेल्या या लढतीत सुजय विखे जवळपास पावणे तीन लाख मताधिक्याने विजयी झाले आणि पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले.

- Advertisement -


आता 2024 लोकसभेच्या रण संग्रामात विखे परिवाराला जवळपास 2019 सारख्याच राजकीय परस्थितून जावे लागत असल्याचे चित्र आहे. माजीमंत्री आ.राम शिंदे लोकसभा उमेदवारी साठी इच्छुक होते. अनेकदा त्यांनी आपली इच्छा जाहीर व्यक्त केली. मात्र सुजय विखे यांनी पुन्हा एकदा बाजी मारत यंदाही उमेदवारी आपल्याकडे खेचून आणली. त्यामुळे कुठे तरी उमेदवारी न मिळाल्याने राम शिंदे नाराज असतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र 2019 प्रमाणेच याही वेळी राधाकृष्ण विखे यांनी पुढाकार घेत सोमवारी सायंकाळी राम शिंदे यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. या भेटी नंतर बाहेर पडलेले विखे-शिंदे यांचे चेहरे खुललेले दिसले. माध्यमांचे प्रतिनिधी हा क्षण टिपत असताना राधाकृष्ण विखे यांनी मीडिया प्रतिनिधींकडे पाहत, बिघडवणारे हेच आणि जुळणारेही हेच अशी मार्मिक टिप्पणी हसत केली.

एकूणच 2019 काय आणि आता2024 काय, सुजय विखे यांना उमेदवारी साठी संघर्ष करावा लागला असला तरी ते उमेदवारी मिळवण्यात बाजी मारतातच, तर या परिस्थितीत नाराजांची नाराजी दूर करण्याचे काम राधाकृष्ण विखे हे लीलया यशस्वी करतात असेच दिसून येत आहे. एकूणच 2019 सारखाच घटनाक्रम दिसून येत असला तरी 2019 ला सुजय विखे यांनी मिळवलेला विजयाची पुनरवर्ती 2024 ला होणार का? याची उत्सुकता असली तरी, विखे है तो मुंमकीन है, असंही लोकं म्हणतात.. मात्र असे असले तरी यासाठी 4 जुन रोजी काय निकाल लागतो याची वाट पहावी लागणार हे नक्की!!

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा