माझ्या जन्मदिनी शाल बुके न देता शालेय साहित्य द्यावा आ.लंके यांच्या आवाहनाला उत्तंड प्रतिसाद
आ.डॉ.निलेश लंके यांचा वाढदिवस भोयरे गांगर्डा सह संपूर्ण मतदार संघात शालेय साहित्य वाटप करत साजरा
मतदार संघात शेकडो वही तुलाच्या व शालेयउपयोगी भेटीच्या माध्यमातुन लाखो रुपयाचे शालेय साहित्य जमा
पारनेर(प्रतिनिधी श्रीकांत चौरे):
आमदार डॉ निलेश लंके यांच्या वाढदिवसा निमित्ताने शाल, बुके ,श्रीफळ ,महागड्या भेटवस्तू या वस्तूंवर अवांतर खर्च करण्यापेक्षा माझ्या गरीब विद्यार्थ्यांना शालेय मदत कशी मिळेल व माझ्या गरीब कुटुंबातील मुलगा हा परिस्थितीला बळी न पडता आधुनिक शिक्षणाचा लाभ घेईल हा माणस ठेवत माझा वाढदिवस हा शालेय साहित्य देत साजरा करावा असे आवाहन पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर निलेश लंके यांनी केले व त्या आवाहनास उस्फुर्त असा प्रतिसादही मिळाला आहे .
माझ्या मतदार संघातील सामान्य कुटुंबातील व्यक्ती उच्चशिक्षित झाला पाहिजे यासाठी आग्रही असणारे आमदार लंके यांनी निघोज व कान्हुर पठार येथे सव्वा दोन कोटी रुपयांच्या अभ्यासिका ही उभ्या केल्या आहेत.अनेक यु पी एस सी व एम पी एस सी गरीब विद्यार्थ्यांना आपल्या आमदारकीच्या पगारातून शिक्षणास मदत करणारे व शैक्षणिक क्षेत्राबद्दल अस्मिता जतन करणारे आमदार लंके यांच्या जन्मदिनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती सोन्याबापु भापकर व शांताराम खामकर सर यांनी तसेच पारनेर नगरपंचायतच्या माध्यमातून व मतदार संघात अनेक ठिकाणी आमदार निलेश लंके यांच्या वजनाच्या वही तुला व शालेय साहित्य तुला करत आपल्या नेत्याप्रती असणाऱ्या भावना व सामाजिक तळमळ जतन करत हा अनोखा वाढदिवस साजरा केला गेला .
रविवारी पार पडलेल्या आ.लंके यांच्या जन्मदिनी प्राथमिक शाळा, भोयरे गंगर्डा येथे,पोलिस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे कार्यरत असलेले इंजिनियर संतोष शिवाजी रसाळ यांच्यातर्फे वह्या वाटप करून व संपत पाडळे यांच्या तर्फे फळे वाटप करून साजरा करण्यात आला.याप्रसंगी
सरपंच रोहिणी गांगड – केकडे, यांच्या हस्ते वह्या वाटप कऱण्यात आले.
प्रास्तविक मा.उपसरपंच दौलत गांगड यांनी केले तर आभार प्रा.शिक्षक यादव सर यांनी मानले. याप्रसंगी उपसरपंच आदिनाथ गायकवाड, मा. सरपंच भाऊसाहेब भोगाडे, मा.उपसरपंच सुधीर पवार, व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज डोंगरे,ग्रा. पं. सदस्य – गणेश सातपुते, उपाध्यक्ष रविंद्र भोगाडे , संचालक संजय पवार, संचालक शिवाजी रसाळ ,संतोष केकडे , सागर रसाळ, मधुकर लगड, संपत पाडळे, गणेश रसाळ, आप्पा कोकाटे , राजेंद्र रसाळ , युवराज रसाळ, संतोष रसाळ, करंजुले मामा , सुरेश पाडळे तसेच मुख्याध्यापक सौ, दरेकर मॅडम, मेमाणे मॅडम, खेडकर मॅडम यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक, सर्व विद्यार्थी उपस्थीत होते.