पाथर्डी(प्रतिनिधी सोमनाथ पाटील बोरूडे):
राष्ट्रीय महामार्ग 61 या महामार्गावर पोळा मारुती मंदिराजवळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जुना खेर्डा फाटा ते मारुती मंदिर परिसरात तत्काळ गतिरोधक बसावेत या मागणीसाठी संतप्त झालेल्या नागरिकांनी आज दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी अभय राकडे यांनी गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्या अनेक दिवसापासून 61 या राष्ट्रीय महामार्गावर जुना खेरडा फाटा ते मारुती मंदिर परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे दिवसातून एक अपघात गतिरोधक नसल्यामुळे या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी तत्काळ गतिरोधक बसावेत अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा करूनही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात होते मात्र काल संध्याकाळी एक मोठा अपघात या ठिकाणी झाला होता.
त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीचे नेते अरविंद सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष भोरू मस्के, महिला आघाडीचे अध्यक्ष रोहिणी ठोंबे, सामाजिक कार्यकर्ते बबलू वावरे, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष आप्पासाहेब बोरूडे,सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे, भाजपाचे माजी नगरसेवक रमेश गोरे, बंडू बोरुडे, देविदास शिंदे, संतोष फलके, सुनील जाधव, बाळासाहेब गिरी,पारूबाई थोरात, आदी आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी अभय राखडे, यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायदे पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर गुप्त वार्ता विभागाच्या भगवान सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.