शिव पाणंद शेत रस्त्यांपासून खऱ्या गरजूंना वंचित ठेवण्याचे मोठे षडयंत्र~ शरद पवळे( महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)
नायब तहसिलदारांची शेतकऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ
गेल्या सहा सात वर्षापासून सुरू पारनेरमध्ये सुरू झालेल्या शिवपाणंद शेतरस्ता चळवळीमुळे सरकारकडून शिव पाणंद शेतरस्त्यांसाठी निधी देण्याचे काम सुरू झाले आहे परंतु गरजू शेतकऱ्यांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष याठीकाणी होत आहे यामुळे शेतकरी तहसीलवर उपोषणाला बसले असुन याची मोठी किंमत प्रशासणाला, सरकारला चुकवावी लागेल -शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)
पारनेर(प्रतिनिधी):
पारनेर तालुक्यात सुरू झालेल्या महाराष्ट्र शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून शेतरस्त्यासाठी शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी प्रशासकीय न्यायालयीन लढ्याबरोबर जनआंदोलनाच्या माध्यमातून ज्वलंतपणा निर्माण करत शेतरस्त्यांसाठी लढा उभा करत जिल्हाभर तहसिल कार्यालयांसमोर शेतकऱ्यांनी चले जाव अंदोलन सुरू करत आमरण उपोषण धरणे आंदोलन करत प्रशासणाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे अनेक जमिनी नापिक होवून फौजदारी स्वरूपाच्या घटना समोर येत आहेत तहसिलवर येणाऱ्या अर्जांना सरळ सरळ केराची टोपली दाखवण्यात येत आहे त्याचबरेबर राजकीय प्रशासकीय वजनाच्या बळावर शेतरस्ते खुले होताना दिसत आहेत सर्वसामान्यांना वर्षानुवर्ष फेऱ्या मारायला लावण्याचे काम याठीकाणी सुरू आहे त्यामुळे प्रशासणाची दुटप्पी भुमिका मोठी घातक आहे हतबल झालेले शेतकरी आज उपोषणाला बसले आहेत परंतु उडउडवीची उत्तरे देत प्रशासण वेळकाढू पणा करत आहे
त्याचबरोबर शेतरस्त्यां सदर्भातील मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान पारनेर तहसिलदारांकडून होत असुन, जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलेले सप्तपदी महाराजस्व अभियान कागदावरच आहे प्रत्यक्ष अंमलबजानी नाही त्यामुळे पारनेरमधील शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने सुरू तहसीलवर सुरू केलेले चले जाव आंदोलन आमरण उपोषण याची दोन दिवस कोणी दखल घेतली नाही तिसऱ्या दिवशी निवासी नायब तहसिलदार गणेश आढारी ,नायब तहसिलदार सुभाष कदम समवेत महसुल सहायक महेंद्र रोकडे यांनी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे योच्याशी संपर्क साधत उपोषणकर्ते रामदास लोणकर भाऊसाहेब वाळूंज, संजय साबळे, बबन गुंड,बबन मावळे आदिंसह प्रगतशील शेतकरी दिपक खंदारे,जेष्ठ नेते गुलाब नवले,रमेश बारवकर,सखाराम भोसले आदिंशी उपोषण स्थळी भेट दिली परंतु समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची भुमिका घेतली जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भुमिका याठिकाणी घेतली आंदोलना दरम्यान अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत पाठींबा दर्शवला असुन अन्नदात्याला उपोषणाला बसण्याची आली यामुळे शेतकरी वर्गात मोठा संताप निर्माण झाला आहे.