पारनेर मध्ये आता रोड रोमिओ आणि हुल्लडबाजांची खैर नाही..पोलीस निरीक्षक बारावकर एक्शन मोडवर..
पारनेर(प्रतिनिधी):
कॉर्नर शहरात काल गुरुवारी भरदिवसा गर्दीच्यावेळी रस्त्यावर शिवसेना नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र यातून ते बालबाल बचावले. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन असलेल्या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. गावठी कट्ट्यातील गोळी न चालल्याने आरोपीने चाकूने नगरसेवक पठारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता. एकूणच शांतता प्रिय असलेल्या पारनेर मधील या घटनेने एकच खळबळ उडाली.
नागरिकांमध्ये यामध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून पारनेरची शांतता बिघडवणाऱ्या समाजविघातक विघ्नसंतोषी व सामाजिक शांतता बिघडवणार्या गुंडांवर कडक कारवाई व्हावी अशी नागरिकांतून मागणी पुढे आली. या पार्श्वभूमीवर आज पारनेर शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांनी एकत्र जमून उस्फूर्तपणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
यावेळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर महिला, पुरुष नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आदींनी पारनेर मधील कालच्या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत निषेध नोंदवला. यावेळी पारनेर पोलीस ठाण्यात नुकतेच बदलून आलेले पोलीस निरीक्षक बारवकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना पारनेरकरांनी पारनेर शहर हे शांतता प्रिय शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील सर्व जाती धर्म घटकांची लोक गुण्या गोविंदाने नांदतात. अनेक लोक शेती, व्यवसाय, नोकरी, उद्योग अशा गोष्टींमध्ये कार्यरत असताना पारनेर शहरातील शांतता बिघडवण्याचे काम काही विघातक शक्ती करत असल्याचे समोर येत आहे. यावर वेळीच पोलिसांनी पायबंद घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
त्याचबरोबर पारनेर बस स्थानक ते कॉलेज रस्त्यापर्यंत पोलिसांची गस्त नियमित असावी. त्याचबरोबर मोकाट फिरणारे रोडरोमिओ, हुल्लडबाज, नशेखर गुंड, शांतता बिघडवणारे अशा लोकांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांना जेरबंद करावे. जेणेकरून त्यांच्यावर जरब बसेल अशी मागणी पोलीस निरीक्षक बारवकर यांच्याकडे केली.
यावेळी पोलीस निरीक्षक बारवकर यांनीही पारनेर शहराची ओळख शांतता प्रिय असेच आहे. त्यामुळे शहरांत काही विघातक शक्ती असतील त्यावर त्याचा बिमोड करण्याचं काम पारनेर पोलीस करतील. नियमितपणे पणे बसस्थानक, कॉलेज परिसरामध्ये उपद्रव्य मूल्य करणारे लोकांवर कारवाई करू. मात्र यात नागरिकांनीही सहकार्य करावे. कारवाई करून नागरिकांना अपेक्षित असलेली कायदा आणि सुव्यवस्था अमलात आणता येईल. निश्चितपणे यापुढे पारनेर मध्ये कोणतेही अघ टीत गोष्ट होणार नाही याची काळजी पोलीस घेतील अशी ग्वाही पोलीस निरीक्षक बारावकर यांनी यावेळी दिली.
या घटनेमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी 18 वर्षापेक्षा कमी असून त्याला नाशिक येथील बालगृहात पाठवले आहे. त्याचबरोबर अजून दोन आरोपींचा पोलीस शोध घेऊन त्यांना लवकरच अटक करतील अशी माहिती बारवकर यांनी यावेळी नागरिकांना दिली.