#आरपीआय आठवले गटाची उत्तर महाराष्ट्राची कार्यकारीणीच घोषित केली नसताना कोणीही परस्पर निर्णय घेऊ शकत नाही..
#उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून झालेल्या निवडींना दिला छेद!!
अहमदनगर(प्रतिनिधी):
भारतीय रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या दक्षिण नगर जिल्हा अध्यक्षपद निवडीवरून आता केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र आरपीआय पक्षात घमासान सुरू झाल्याचे चित्र आहे. यावर आता उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी अगदी स्पष्ट भूमिका मांडली असून त्यात आठवले साहेबांच्या नगर दौऱ्याची बैठक असताना त्यात जिल्हाध्यक्ष बदल, उत्तर महाराष्ट्र कार्यकरणीत पद बहाली या सर्व बाबी आपल्या परस्पर झालेल्या असल्याचे सूचित केले आहे. मूळात या नियोजन बैठकीची माहितीच आपल्याला नव्हती असा मोठा खुलासा करताना एका विभागाच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत झालेले निर्णया बाबत माहिती नाही. मुळात उत्तर महाराष्ट्राची कार्यकारीणीच अजून जाहीर झालेली नाही. त्यासाठी पाचही जिल्ह्यातून नावे मागवली आहेत, त्यावर विचारमंथन होऊन राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या सहमतीने कार्यकारीणी घोषित होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकरणीत जर कोणी परस्पर निवड घोषित केली असली तरी आपल्या पर्यंत आलेली नसल्याने त्यावर काही बोलायचे नसल्याचे प्रकाश लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.
नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या कडून हटवून कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांचा जिल्हाध्यक्षपदी केलेला फेरबदल आणि साळवे यांची उत्तर महाराष्ट्र कार्यकारणीत सचिव पदी दिलेले पद यावर बोलताना लोंढे यांनी, मुळात रामदास आठवले साहेबांच्या आरपीआय पक्षात अशा पद्धतीने कधीही पदांमध्ये परस्पर बदल होत नाही. त्यासाठी पक्षाच्या संकेतानुसार बदल करावयाच्या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठांच्या उपस्थितीत क्रियाशील सदस्य-पदाधिकारी यांची बैठक होते. त्यात पदे बदलणे, बढती आदी निर्णय होतात त्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्षांची संमती, मार्गदर्शन असते. तसेच कोणतेही पदाधिकाऱ्यांच्या पदात बदल करताना आठवले साहेब काळजी घेतात. 30-30/40-40 वर्षे कार्यकर्ते-पदाधिकारी पक्षासोबत राबत असतात. अशा वेळी संघटनात्मक बदल हे सर्वांचा सन्मान ठेवत घेतले जातात आणि हा पायंडा राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांनी पाडून दिलेला आहे. त्यामुळे संकेतांना बाजूला सारून काही झालेले निर्णय वरिष्ठां पर्यंत आलेले नाहीत. त्यामुळे त्यावर आपणाला काहीही माहितीच नसल्याने बोलायचे नसून उत्तर महाराष्ट्र कार्यकारीणी लवकरच राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्ष, सचिव यांच्या सोबत चर्चा करून घोषित केली जाईल, असे सांगत तो पर्यंत मला माहितीच नसलेल्या निर्णयावर काही बोलण्यास उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी नकार देत एकप्रकारे सुनील साळवें बाबत परस्थिती जैसे थे असल्याचे अप्रत्येक्ष सांगण्याचा प्रयत्न केला आहे.