Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
23.6 C
New York
Monday, August 25, 2025

जिल्ह्यात चिमुकले बिबट्याच्या निशाण्यावर!! दोन आठवड्यात गेला तिसरा बळी

नगर:

आज गुरुवारी संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथील हर्ष राहुल गोरे या साडेपाच वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याने त्यातत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या दोन आठवड्यात नगर जिल्ह्यात राहाता, श्रीगोंदा, संगमनेर तालुक्यातील वेगवेगळ्या हल्ल्यात बिबट्याने लहान चिमुकल्यांचा बळी घेतल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे.

सादतपूर ता. संगमनेर येथील माजी उपसरपंच प्रकाश गोरे माजी उपसरपंच यांचा पुतण्या हर्ष राहुल गोरे वय – 5 वर्ष 6 महिने याच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्या मुलाला PMT येथे तातडीने आणण्यात आले मात्र त्याचा तो पर्यंत मृत्यू झाला होता. सादतपूर येथील गोरे वस्तीवर नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षे हर्षल राहुल गोरे गंभीर जखमी झाला. सदर घटना सादतपूर येथील गोरे वस्तीवर सायंकाळी चार ते साडेचार च्या दरम्यान घडली. राहत्या घरा कडून चुलतेच्या घराकडे जात असताना रोड लगत गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षल वर झडप घालून त्याला गिन्नी गवतात ओढून नेले.  त्यावेळी त्याच्या भावाने त्याचा वाघ-वाघ म्हणत ओरड केली. हर्षलचे घरचे सर्व ओरडत गवताकडे पळाले असता  बिबट्याने तिथून धूम ठोकली. जखमी हर्षल राहुल गोरे यास उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

- Advertisement -

लोणी येथील घटना ताजी असतानाच दहा दिवसाच्या अंतरावर नरभक्षक बिबट्याने आज सादरपुर मध्ये पुन्हा पाच वर्षे बालकावर हल्ला करून त्याला ठार केले. दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेमुळे सादरपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. गेल्या दहा दिवसापासून वन विभागाने विविध ठिकाणी 15 पिंजरे लावले आहेत. पण आतापर्यंत या पिंजऱ्यामध्ये प्रवरानगर पाथरी रोडवरील थेटे वस्तीवर एकच बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आहे. वन विभागाच्या माध्यमातून लावलेल्या पिंजऱ्यांना बिबटे हुलकावणी देऊन लहान बालकावर हल्ला करत आहेत. नरभक्षक बिबट्या अजून किती बळी घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

14 जानेवारी रोजी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील संगमनेर रस्त्यावरील गोसावी वस्तीजवळ रविवारी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात अथर्व प्रवीण लहामगे या ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने लोणी परिसर हादरून गेला होता.  प्रवरा रुग्णालयासमोरील रहिवासी भागात काही मुलं सायंकाळी पतंग उडवीत होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अथर्व याचा पतंग तुटून तो शेजारच्या शेतात जाऊन पडला.तो आणण्यासाठी अथर्व गेला असता मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून मकाच्या शेतात ओढून नेले.अंधार पडला तरी अथर्व घरी आला नाही म्हणून घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला.त्याच्या मित्रांकडे चौकशी केली.रात्री १० वाजण्याच्या सुमारास अनेक नागरिकांनी पुढे येत शेतात शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.

- Advertisement -

19 जानेवारी रोजी श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज इथे शेताच्या कडेला असलेल्या झोपडीच्या बाहेर आपल्या भावाबरोबर बसलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेऊन ठार मारल्याची खळबळजनक घटना घडली होती. अजनूज येथे अरुण गायकवाड या  ऊसतोड मजुराची मुळी लक्ष्मी (वय ३) या चिमुकलीवर बिबट्याने हा हल्ला केला होता. बिबट्याने उचलून या मुलीला उसाच्या शेतात नेले. या घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिक मुलीच्या शोधासाठी धावले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर ती मुलगी गंभीर जखमी अवस्थेत शेतात पडलेली आढळून आली. तीला तातडीने उपचारार्थ श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.

अकोल्याच्या मार्केट मध्ये..
याच आठवड्यात अकोले शहरातील वसंत मार्केटमध्ये एक बिबट्या घुसला, मात्र तो एका ठिकाणी अडकला अनेक तास प्रयत्न करूनही त्याला बाहेर काढता येत नव्हते त्यानंतर नाशिकहून वनविभागाचा वनविभागाचे रेस्क्यू टीम बोलवण्यात आली त्यानंतर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जर बंद करण्यात यश आआले.

बिबट्याला आवरा..जनभावना होतेय तीव्र!!
-जंगलात राहणारा बिबट्या गेल्या काही काळापासून सर्रासपणे शहरी भागात आक्रमण करत असून भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्याच्या अनेकांचे बळी गेले आहेत. तर कित्येकजण जखमी झाली आहेत. वाढते शहरीकरण, गावांचा होत चाललेला विस्तार, जंगल भागात होणारे औद्योगिकरण आदी कारणांमुळे बिबट्याने आपल्या जंगल भागात होत असलेल्या अतिक्रमणाला आक्रमणाने उत्तर देणे सुरू केलेय का असे म्हणण्याची वेळ आली आहे.  घराबाहेर असलेले कुत्रे, शेळ्या, कोंबड्या असे खाद्य मिळत असल्याने मानवी वस्ती कडे सर्रास वावर सुरू केला असून यात अनेकदा लहान मुले बळी पडत आहेत. मात्र आता या घटनांत होत चाललेली वाढ पहाता ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातले नागरिकही धास्तावले आहेत. अनेकदा वन विभागाला कळवूनही पिंजरे लावले जात नाहीत, नागरिकांचा दबाव वाढल्यावर एखादा पिंजरा लावण्यात येतो. पिंजऱ्या बरोबरच वन कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. मात्र यात आता वाढत्या हल्ल्यात निष्पाप लहान मुलांचा बळी जाण्याच्या घटना सलगपणे होताना दिसत असल्याने नागरिकांत भीती आणि संतापाची भावना आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर वा त्यांच्या मानवी वस्तीकडे वाढलेल्या वावरावर वन्य प्राणी कायदे आडवे येत असेल तर त्यावर मार्ग काढा अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा