Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
8.6 C
New York
Tuesday, October 20, 2026

राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टरेट..

राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 37 वा पदवीप्रदान समारंभ

ना.राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले आणि विलास शिंदे यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानीत करण्यात येणार

राहुरी(प्रतिनिधी श्रीकांत जाधव):
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा 37 वा पदवीप्रदान समारंभ सोमवार दि. 29 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वा. आयोजीत करण्यात आला आहे. कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालया समोरील मंडपामध्ये होणार्‍या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस हे ऑन-लाईन उपस्थित असणार आहेत. यावेळी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषि मंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी ट्रस्ट फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल सायन्सेस (टास) चे अध्यक्ष, भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे माजी सचिव तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्म भूषण डॉ. आर.एस. परोदा हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करणार आहेत.

- Advertisement -

यावेळी या समारंभासाठी विद्यापीठाचे विद्यापीठ कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले व नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली.

पदवीदान समारंभात गेल्या वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण 6 हजार 895 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती श्री. रमेश बैस यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहेत. त्यात विविध विद्याशाखातील 6 हजार 522 स्नातकांना पदवी, 300 स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर 73 स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल. यावेळी यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा