मराठा आरक्षणावर अजित पवारांनी मांडली “ठाम” भूमिका.. जरांगेच्या प्रतिक्रिये कडे आता लक्ष!!
#आरक्षण देण्याला कुठल्याही नेत्याचा विरोध नाही ते दिलेच पाहिजे मात्र काहीजण ऐकायला तयार नाही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत – उपमुख्यमंत्री अजित पवार
नगर:
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणतीही भूमिका रोखठोकपणे मांडण्यासाठी सर्वश्रुत आहेत. सध्या मराठा समाजाला ओबीसी मधून “कुणबी” दाखल्याच्या आधारावर सर्व समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. आता त्यांनी मुंबई कडे मोर्चा वळवला असून मुंबईत मराठा समाजाचे कोटींच्या संख्येने आंदोलन होईल असे घोषित केले आहे. राज्य सरकार या प्रश्नावर जरांगे यांच्याशी संपर्कात रहात मार्ग काढून मुंबईतील आंदोलन टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र समाधानकारक तोडगा यात अद्याप निघत नसल्याने जरांगे पाटलांनी नियोजित जालना ते मुंबई लॉंग मार्च होणारच अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे महायुती सरकार मधील मुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार मराठा आरक्षण मुद्यावर कायद्यावर टिकेल असा मार्ग काढत असल्याचे सांगताना, मात्र काहीजण ऐकायला तयारच नाहीत, असे स्पष्टपणे सुनावले आहे.
आपल्या भाषणात अजित पवार यांनी, राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा गंभीर असून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत येणाऱ्या काळात मागासवर्गीय वर्गीय आयोगाचे सर्वेक्षण सुरू होणार आहे त्यालाही जनतेने सहकार्य करावं कारण आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत राहून देता आलं पाहिजे कारण यापूर्वीही आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला होता मात्र ते हायकोर्टामध्ये टिकलं नाही त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीही आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टामध्ये टिकलं मात्र सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलो नाही त्यामुळे आरक्षण देण्याला कुठल्याही नेत्याचा किंवा कुणाचाही विरोध नाही मात्र काही लोक ऐकायलाच तयार नाही त्यामुळे त्यांनीही थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे असही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं ते सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे यांच्या नवव्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा येथे बोलत होते