# अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी घोषित
# महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना..
#केडगावकरांची उमेदवारी कोड्यात.. दादा, ताई की माघार यावर संभ्रम
अहिल्यानगर(राजेंद्र त्रिमुखे):
– विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजून चार दिवस उलटल्यानंतरही अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातील विरोधकांची राजकीय चित्र संभ्रमावस्थेत असल्याचं एकंदरीत चित्र आहे
एकीकडे महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा मार्ग आज पक्षाच्या जाहीर करण्यात आलेल्या ३८ उमेदवारांत यादीतून मोकळा झाला आहे.त्यांची उमेदवारी केवळ औपचारिकता होती, आज त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जगताप समर्थक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष सुरू केला आहे. दुसरीकडे समोर विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न सध्या स्वतः आमदार संग्राम जगताप यांनाच पडला असावा अशी परिस्थिती आहे.
महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेना काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षातील स्थानिक नेत्या ंनी उमेदवारीचे बाशिंगे गुडघ्याला बांधलेली असली तरी राज्य पातळीवर नगरची जागा कोणाला मिळणार यावर अजूनही खल सुरू असल्याचे दिसून येत आहे मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर शहराची जागा ही ठाकरे शिवसेने ऐवजी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे केडगावकरांनीही अहिल्यानगर शहरातील निवडणुकीत उडी घेतल्याचे चित्र समोर असले तरीही अनेक कायदेशीर पेचात अडकलेले केडगावकरांना नेमका कोणता मार्ग सापडतो याचे उत्तर नगरकरांना सध्या अज्ञात आहे. शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार दादा यांनी उमेदवारी करावी अशी कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा असली तरीही कायदेशीर अडचणी येत असतील तर ताईंना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी इच्छा आहे. अभी नही तो कभी नही असा कार्यकर्त्यांची भावना असली तरीही एकूणच अहिल्या नगरातील “सोधा” राजकारणाचा एकंदरीत पाया पाहता नेमका निर्णय काय होणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना शहरात उधान आले आहे.
काही स्थानिक माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या पेरल्या जात असल्याचेही चर्चा आहे. काही बातम्या संकेतस्थळावरून हटवण्यात येऊन नव्याने बातम्या टाकल्या जात आहे. यातून एकंदरीतच आ. संग्राम जगताप यांच्या विरोधातील उमेदवारीचा घोळ किती खोलवर गेलेला आहे याची प्रचिती नगरकरांना आता येऊ लागली आहे. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीतून अनेक इच्छुक असताना राज्यातील नेतृत्व यातील कुणाला उमेदवारी देणार याची उत्तर पुढे येत नसतानाच केडगावकरांना उमेदवारीला प्राधान्य द्यायचे असेल तर न्यायालय अडचणी त्याचबरोबर “सोधा” राजकारणात यावर निघणारा उतारा काय असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दुसऱ्या बाजूने महायुतीतील विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची प्रचाराची एक्सप्रेस सुसाट पुढे निघालेली आहे. सध्या आमदार संग्राम जगताप हे पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे दिवस उजाडल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत शहर मतदारसंघातील विविध भागात बैठकांमध्ये व्यस्त असून विविध विविध भागात जात आपला प्रचार नेटाने करत आहेत. आमदार संग्राम जगताप यांचे मतदारसंघातील ग्राउंड नेटवर्क गेल्या दहा वर्षांपासून तगडे मानले जाते. विशेष करून युवा वर्गात त्यांची मोठी क्रेझ आहे आणि त्यामुळेच संग्राम जगताप सध्या विविध भागात संपर्क अभियान राबवत आहेत त्या ठिकाणी स्थानिकांची मोठी गर्दी होत असून पुन्हा एकदा संग्राम जगताप यांना निवडून देण्याचा चंग कार्यकर्ते आणि नागरिकांतून दिसून येत असल्याचे एकंदरीत चित्र समोर येत आहे. “विश्वास जुना संग्राम जगताप पुन्हा” अशा टॅग लाईन वर संग्राम जगताप यांनी तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली असून त्यांचे विजयाचे गणित अगदी साधे सोपे आणि सरळ असल्याचं अनेक जाणकार सांगत आहेत याउलट विरोधात असलेल्या महाविकास आघाडीतील उमेदवारीचे त्रांगडे एकंदरीत बुधवार पर्यंत दुपार पर्यंत निघालेले नसल्याने त्याचबरोबर केडगावकर यांचा मनातील निर्णय नेमका काय याबद्दलही कार्यकर्त्यांसह नगरकरांत उत्सुकता असल्याने दुसरीकडे संग्राम जगताप मात्र आपल्या प्रचाराची दौड तुफानी वेगाने पुढे नेताना दिसून येत आहेत.