Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
3.5 C
New York
Monday, October 19, 2026

मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

अहिल्यानगर: नगर जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांची दिनांक 7/ 4/2018 रोजी निवडणुकीच्या वादातून हत्या करण्यात आला होता. या दुहेरी खुनामुळे नगर जिल्ह्यामध्ये खळबळ माजली होती. सदरच्या प्रकरणांमध्ये नगर जिल्ह्यातील प्रभावी राजकीय कुटुंबातील संदीप कोतकर यांचाही समावेश होता.

दरम्यान आरोपी संदीप कोतकर यांनी या दुहेरी खून खटल्यात जिल्हा न्यायालय मध्ये जामिनासाठी अर्ज केला होता.जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्याला नगर जिल्ह्यामध्ये बंदी करण्यासंबंधी अट घातली होती. सदर अटीतून सवलत मिळण्यासंबंधी आरोपी संदीप कोतकर यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केला होता. सदरच्या अर्जाच्या अनुषंगाने मूळ फिर्यादी यांच्या वतीने सदर प्रकरणात जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. त्या अनुषंगाने न्यायालयाने आज कोतकर यांचा अर्ज निकालासाठी ठेवला होता.

दरम्यान,न्यायालयाने दिलेल्या सवलतीचा दरुपयोग करून संदीप कोतकर यांनी काल नगर जिल्ह्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करून विनापरवानगी जंगी मिरवणूक काढली होती.ही मिरवणूक केडगाव मधून जात असताना संदीप कोतकर व त्याचे सहकारी यांनी फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या आईला धमकावल्यासंबंधी संग्राम कोतकर यांनी काल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.त्याचप्रमाणे मिरवणुकीच्या दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यासंबंधी कोतवाली पोलीस स्टेशन यांनी वेगळी फिर्याद दाखल केली आहे.या दोन्ही फिर्यादीच्या अनुषंगाने संदीप कोतकर याच्या राजकीय अडचणीमद्धे वाढ होणार आहे.

- Advertisement -

सदर दोन्ही फिर्यादीच्या अनुषंगाने फिर्यादी यांनी आज जिल्हा न्यायालय मध्ये शपथपत्र दाखल करून आरोपी संदीप कोतकर यांनी न्यायालयाने दिलेल्या जामिनाचा दुरुपयोग करून फिर्यादी यांच्या आईला धमकावले संबंधीची तक्रार दाखल झाल्याची माहिती न्यायालयाला दिली.त्याचप्रमाणे आरोपी कोतकर यांच्या जिल्हा प्रवेशामुळे नगरमधील विधानसभेची निवडणूक भयमुक्त वातावरणात होऊ शकत नसल्यासंबंधीचे विवेचन न्यायालयासमोर केले होते.

एकंदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच मूळ फिर्यादी यांच्यातर्फे केलेला युक्तिवाद लक्षत घेऊन न्यायालयाने संदीप कोतकर याचा जिल्हा बंदी उठवण्यासंबंधीचा अर्ज आज रोजी फेटाळला आहे.

- Advertisement -

सदर प्रकरणी फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ कायदेतज्ञ उमेशचंद्र यादव-पाटील यांनी काम पाहिले.त्याना मदतीला अहमदनगर न्यायालय येथील वकील समीर पटेल यांनी ही उपयुक्त असा युक्तिवाद केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा