Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
26.4 C
New York
Monday, August 25, 2025

सुप्रिया सुळेंनी केला गंभीर आरोप!! राज्यात भाजप सत्तेत आले की.. पुणे झाले..!!

नगर:
खा.सुप्रिया सुळे यांनी राज्यातील भाजप महायुती सरकारवर विविध विषय आणि घटनांच्या अनुषंगाने मोठे गंभीर आरोप करत टीका केली आहे. भाजप राज्यात सत्तेत आले की गुन्हेगारी (क्राईम रेट) वाढते. राज्यात सर्वत्र गुन्हेगारीच्या आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटनांत वाढ झालेली असून क्राईम सिटी म्हणून नागपूरची जागा आता पुणे शहराने घेतली असल्याचे मोठे विधान केले आहे. या परस्थितीत राज्यातील जबाबदार नेत्यांची वक्तव्य बेजबाबदार असल्याची टीकाही सुळे यांनी केलीय. नगर मध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सदर आरोप केले. यावेळी त्यांच्या सोबत अकोले येथील कार्यक्रमास जाण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. मात्र पवार यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.

विशाळगड हिंसचार!!
-विशाळगड आणि येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार बाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळे राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

इंग्लंडच्या म्युजियम मधील वाघनखे खरे की..
-वाघ नखे खरे आहेत की खोटे याबाबत सरकारने माहिती द्यावी जर शालेय विद्यार्थ्यांना आपण ही नखे ऐतिहासिक असल्याचे सांगत आहोत आणि कालांतराने ही नखे खोटी निघाली तर सरकारच आपल्याला फसवतोय. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे कृत्य करू नये आणि मुलांवर काय संस्कार होतील असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या असून सरकारने याबाबत खरी माहिती द्यावी असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

मोहन भागवत वक्तव्यावर सुळेंचे मौन:
-कोणीही सुपरमॅन होण्याचा प्रयत्न करू नये आणि अवतारी पुरुष असल्याचे मानू नये. या अनुषंगाने मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्य बाबत सुप्रिया सुळे यांनी मौन बाळगलेअसून मला याबाबत माहीत नसल्याचं उत्तर त्यांनी दिल आहे.

भाजप अजित पवार गट दुरावा!!
-सुळे यांनी यावर बोलताना भाजप आणि अजित पवार गटामध्ये सध्या दुरावा आहे. मात्र ही भाजपची जुनी निती असून सातत्याने मित्र पक्षांवर अप्रत्यक्षपणे टीका कशी करता येईल त्याबरोबर मित्र पक्षांचे मॉरल डाऊन करणे हे सातत्याने होताना दिसतेय. मात्र हा त्यांच्या अंतर्गत पक्षाचा प्रश्न असून आपण त्याबाबत बोलणार नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

आरएसएस मुखपत्र..
-आरएसएस च्या मुखपत्रातून सांगण्यात आले होते की अजित पवारांना बरोबर घेतल्याने पक्षाचे नुकसान झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की आर एस एस आणि भारतीय जनता पक्ष हे मित्र असून आणि सातत्याने आरएसएस च्या मुखपत्रातून अशा सूचना येतात यावर आम्ही काय बोलणार त्यांच्या आघाडीचा हा अंतर्गत प्रश्न आहे.

पुणे गोळीबार..
-आधी महाराष्ट्रात नागपूर ही क्राइम सिटी होती मात्र आता हा बदल होत चालला असून आता पुणे शहर क्राईम सिटी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात क्राईम रेट वाढला आहे. शिक्षणाचं माहेर घर असलेले पुणे शहर आज क्राइम सिटी म्हणून उदयास येत असल्याचं दुर्दैव असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितल याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

पूजा खेडकर..
-आज महाराष्ट्रात पाऊस, बेरोजगारी आणि दुष्काळ असे अनेक प्रश्न आहेत मात्र सरकारने पूजा खेडकर यांच्या बाबत सविस्तर माहिती द्यावी. सरकारने यासाठी दोन-तीन आठवडे घ्यावे आणि खरी माहिती जनतेसमोर आणावी अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.

-अनेक वर्ष महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा होत आहेत मात्र त्यामध्ये पारदर्शकता नाही असं डेटा सांगतोय. त्यामुळे नीट मध्ये एसआयटी लावावा लागला त्यामुळे स्पर्धा परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत. याबाबत आम्ही पार्लमेंट मध्ये आवाज उठवत आहोत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा