नगर:
नाशिक – ९१.६३%
नगर – ९३.८८%
जळगाव- ९५.२६%
धुळे- ९३.७७%
नंदुरबार- ९६.१२%
एकूण सरासरी- ९३.४८%
(ही आकडेवारी सरासरी अंदाजित असून अंतिम आकडेवारी उद्या सकाळ पर्यंत जाहीर होईल. यात काहीशी वाढ शक्य आहे)
नाशिक शिक्षक साठी ९० टक्याच्या वर मतदान.. पाच वाजे पर्यंत ८४.८६ टक्के मतदान
#मतदानाच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोप सुरूच
नगर:विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज नगर, नाशिक,जळगाव, धुळे,नंदुरबार या पाच जिल्ह्यातील ५३ तालुक्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात 21 उमेदवार आपले नशीब आजमावत असून त्यांचे भविष्य मतपेटीत बंद झाले. सायंकाळी ५ वाजे पर्यंत पाच जिल्ह्यात सरासरी ८४.८६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक शाखेने कळवली. शेवटचे वृत्तानुसार सरासरी 90 टक्याच्या पूढे मतदान पार पडल्याची माहिती होती.
पाच वाजे पर्यंत पार पडलेले मतदान आकडेवारी:
नाशिक -२१,५९६ (८५.२५%)
अहमदनगर-१४३७० (८२.६२%)
जळगाव- १०,९७१ (८३.६१%)
धुळे -७,०६५ (८६.५९%)
नंदुरबार- ४८६७ (९०.२५%)
सरासरी: ८४.८६%
यावेळी राजकीय पक्षांनी निवडणुकीत उडी मारल्याने प्रचारात मोठी चुरस निर्माण झाली. टीडीएफ अंतर्गत दावे-प्रतिदावे आणि काही संस्थाचालक अपक्ष उमेदवारांमुळे कुणामुळे कुणाला धक्का बसणार हे निकालानंतर समजेल. तसेच गेल्यावेळी निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून येत नाही अशी परंपरा कायम राहते की खंडित होते याचीही उत्सुकता असणार आहे.
नाशिक शिक्षक साठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून किशोर दराडे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून महेंद्र भावसार, उद्धव ठाकरे शिवसेने कडून संदीप गुळवे तसेच टीडीएफचे भाऊसाहेब कचरे आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष शिक्षण संस्था चालक अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात मुख्य लढत असल्याचे दिसून आले आहे. शिक्षक मतदातसंघ असल्याने उमेदवार शिक्षकच असावा अशी अपेक्षा टीडीएफसह अनेक शिक्षण क्षेत्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र राजकीय पक्ष आणि संस्थाचालकांच्या स्पर्धेत या मागणीकडे दुर्लक्ष झाले. तसेच मागील निवडणुकी प्रमाणे शिक्षक मतदारांना विविध आमिषे दाखवण्याचा प्रकार यंदाही पुढे आला. मतदारांना पैसे,पैठणी साडी, सोन्याची नथ, सफारी कापड वाटल्याचे छायाचित्रे, व्हिडीओ माध्यमातून दिसून येत उमेदवारांनी परस्परांवर आरोप केले. मतदानाच्या दिवशीही उमेदवाराच्या प्रचार पत्रकासह पैशाची पाकिटे वाटणे, मतदान कक्षात उमेदवाराने मोबाईल घेऊन जाणे असे प्रकार चर्चेत आले. सर्वात अधिक मतदान असलेल्या नाशिक जिल्ह्यात याबाबतच्या तक्रारी अधिक दिसून आल्या.
काँग्रेसच्या थोरातांवर आघाडी धर्म न पाळल्याची टीका!!
-काँग्रेसचे जेष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर भाजपचे विखे गटाकडून, थोरातांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी धर्म न पाळल्याची टीका करण्यात आली. थोरातांच्या संस्थांवर अपक्ष विवेक कोल्हे यांच्या प्रचाराचे फ्लेक्स लागले गेल्याचा आरोप करण्यात आला. नाशिक पदवीधर निवडणुकी वेळीही थोरातांची यंत्रणा त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्यासाठी सक्रिय असल्याने मविआकडून शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे थोरात आघाडी धर्म पाळत नसल्याने याचा विचार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करावा आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी यावर बोलावे असा टोमणा मारण्यात आला आहे.