Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
20.3 C
New York
Monday, August 25, 2025

कर्जत तालुक्यातील तीखी’च्या ग्रामसेवकाच्या कामकाजाच्या चौकशीचे आदेश!!

नगर:
नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तीखी ग्रामपंचायत तीचे ग्रामसेवक धोबे तात्यासाहेब अप्पासाहेब यांनी विविध योजनेत मोठी अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला असून थेट ग्रामविकास विभागाकडे केलेल्या तक्रारी नंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) यांनी कर्जत गट विकास अधिकाऱ्यांना संबंधित तक्रारीची चौकशी करून अफरातफरी बाबत उचित कारवाई करत जिल्हा परिषदेला अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.

या बाबत स्थानिक नागरिक नामदेव दळवी यांनी याबाबत तक्रार केली होती. तक्रारीत तीखी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक धोबे तात्यासाहेब अप्पासाहेब यांनी, गावात ग्रामपंचायत कार्यालयात वेळोवेळी हजर न राहने, फोन केल्यास उडाउवी ची उत्तरे देणे, १५. वां वित्त आयोगातील कामाची परस्पर बिल काढणे, उदा सार्वजनिक कचरा कुंजा खरेदी न करताच पैसे काढणे, गावाअंतर्गत पाइपलाइन न करता पैसे काढणे, अंगणवाडी साहित्य घोटाळा, जिल्हा परिषद शाळा फिल्टर संगणक खरेदी, पंतप्रधान आवस योजपणे अंतर्गत येणाऱ्या योजनेचा गरजू व्यक्तींना लाभ न देता नातेवाईक आणि गावातील इतर लोकाकडून १५ हजार रुपये घेऊन संबंधित व्यक्तींना लाभ देणे, गावातील लोकांना जन्मदाखले, जागेचे उतारे देण्यास टाळाटाळ,घरकुल योजनेतील गरजू लाभायाँना प्राधान्य कम चुकवणे, ग्रामपंचायत सदस्य यांना बैंक खात्याचा तपशील आणि इतर महत्वाचे दप्तराखण्यास टाळाटाळ करणे . ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेणे. या प्रकारच्या गंभीर तक्रारी करत शासनाच्या संबंधित विभागाकडे ऑनलाईन तक्रार केली होती.

याबाबत ग्रामविकास विभागाने गांभीर्याने दखल घेत अहमदनगर जिल्हा परिषदेला संबंधित तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहमदनगर जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांना या प्रकरणी चौकशी आणि चौकशीत तथ्य असल्यास उचित कारवाईचे आदेश देत याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

ग्रामसेवकाची अरेरावी!!
सदर ग्रामसेवक यांची तालुकास्तरावर तक्रार केली होती, पण मी ग्रामसेवक तालुका संघटना अध्यक्ष आल्याने कुणीही माझे काही होणार नाही, अशी अगतिकता तक्रारदार नामदेव दळवी यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने आपण ऑनलाईन पद्धतीने शासन दरबारी आपली तक्रार नोंदवली असल्याचे आणि आता चौकशीत संबंधितांवर योग्य ती चौकशी करून कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा