Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
26.4 C
New York
Monday, August 25, 2025

लंकेंच्या विजयाने नगर शहरात मविआ’त विधानसभा उमेदवारीसाठी रस्सीखेच!!

नगर:

अगदी अटीतटीच्या झालेल्या नगर दक्षिणेतील लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या सुरुवातीपासून चर्चेत राहिलेले महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांचा विजय झाला. डॉ सुजय विखे यांच्या पराभवाने विखे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पालकमंत्री या नात्याने राधाकृष्ण विखे यांना जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिणेत महायुतीसाठी विजय मिळवता आला नाही. एकूणच राज्यात दबदबा असलेल्या विखेंचे नगर जिल्ह्यात असलेल्या एकहाती वर्चस्वाला मोठा धक्का मानला जात असून याचे पडसाद राधाकृष्ण विखेंच्या राज्यातील असलेल्या दबदब्यावर पण पडणार आहे. महायुतीच्या पराभवाचे मोठे पडसाद चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवरही निश्चितच पडणार असे आताचे चित्र आहे. जिल्ह्यातील दोन्ही जागांवरील निकालाने काँग्रेसचे जेष्ठनेते बाळासाहेब थोरात यांचा वरचष्मा वाढला असल्याचेही पुढे येत असल्याने विधानसभेतील राजकिय गणिते महाविकास आघाडी भोवती फिरणार असेच म्हणावे लागेल. आणि याच अनुषंगाने आता येणाऱ्या विधानसभेसाठी जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील अनेक इच्छुक नेत्यांत उमेदवारीसाठी चुळबूळ सुरू झाली असून त्याची सुरुवात नगर शहरातून सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

निलेश लंके यांच्या विजयाबद्दल अभिनंदनपर फ्लेक्स काँग्रेस कडून झळकले असून यावर नगर शहरात शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे भावी आमदार म्हणून उल्लेख असलेले मोठाले फ्लेक्स झळकले आहेत. या फलकांवर शुभेच्छुक म्हणून शहर विकास मंच, किरण काळे युथ फाउंडेशन आणि समस्तनगरकर नागरिक असा उल्लेख आहे. तर राष्ट्रवादीने आता लोकसभेच्या मदतीची विधानसभेला परतफेड करावी असे म्हणत काळेंच्या उमेदवारीसाठी काँग्रेस श्रेष्ठींकडे शहर काँग्रेस दावा करणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. या माध्यमातून काळे समर्थकांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला असल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्ह्याध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लागलेल्या शुभेच्छा  फलकांवर नगर शहराचे भावी आमदार म्हणून उल्लेख होता. अर्थात स्वतः कळमकर यांनी फलक समर्थक कार्यकर्त्यांनी लावले असल्याचे सांगत निवडणूक लढवण्याबाबत अद्याप कसलाही निर्णय नसल्याचे सांगत महाविकास आघाडी असल्याने पक्ष श्रेष्ठी पातळीवर याबाबत निर्णय होईल असे स्पष्ट केले होते.

नगर शहरात तब्बल 25 वर्षे दिवंगत अनिलभैय्या राठोड यांनी शिवसेनेकडून आमदारकी शाबूत ठेवली. मात्र 2014 आणि2019 ला त्यांचा पराभव झाला. असे असलेतरी आजही अनिलभैय्यांच्या नावाची जादू कायम आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठा मोठा आहे. युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी अनिलभैय्यांचा वारसा पुढे सुरू ठेवत शिवसेनेची ताकत कायम ठेवलेली आहे. नगर शहरातील जागा युतीत असताना शिवसेनेनेच लढवली आहे. त्यामुळे साहजिकच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दावा असणार आहे. अर्थात शहरातील ठाकरे यांच्या शिवसेने अंतर्गतही उमेदवारीसाठी रस्सीखेच असणार आहेच.

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर शहरातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना 31 हजार 586 मतांची आघाडी आहे. 2019 ला विखे यांना पन्नास हजारांवर आघाडी होती. आ.संग्राम जगताप सोबत असतानाही ती यंदा घटली आहे हे विशेष. तसेच राज्यातील लोकसभेचे एकूण निकाल पाहता राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असणार आहे. या अनुषंगाने नगर शहरातही मविआ मधून उमेदवारी साठी मोठी रस्सीखेच होणार हे निश्चित आहे. या अनुषंगाने काँग्रेसच्या किरण काळे यांनी आपल्या गटातील पदाधिकाऱ्यांच्या आडून उमेदवारी साठी आघाडी घेतल्याचे म्हणावे लागेल.

निलेश लंके यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने एकत्र असल्याचे दिसून आले आहे. केजरीवाल यांच्या आपसह डावे पक्ष आदींनी लंकेंच्या विजयात हातभार लावला आहे. याचाच एकूण परिणाम म्हणून सुजय विखेंना नगर शहरातून मोठ्या आघाडीची अपेक्षा असताना ती त्याप्रमाणात पूर्ण होऊ शकलेली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून विखेंना पराभवाला सामोरे जावे लागले असल्याची मोठी चर्चा आहे. मुस्लिम,ख्रिश्चन, आंबेडकरवादी समाज पाठीशी राहिल्याचा दावा खा. लंके यांनी केला आहे. त्यामुळे सलग दोन टर्म निवडून आलेल्या आ. संग्राम जगताप यांच्यासमोर महाविकास आघाडी मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मविआ मधून आता नगर शहराची जागा कोणत्या पक्षाला देण्याबरोबरच उमेदवारी कुणाला द्यायची असा दुहेरी प्रश्न ठाकणार एव्हढे मात्र निश्चित.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा