Latest news
एमपीएससी'चे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा!! रोहित पवारांचा मोठा दावा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंची माघार आणि यावर रोहित पवारांची बोचरी टीका करत निशाणा!! दुष्काळ आढावा बैठकीच्या निमित्ताने विखे-राम शिंदे एका मंचावर.. राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर.. अशा असतील  उपाययोजना!! कोतवाली पोलिसांची ‘गांजा कारवाई’ संशयाच्या भोवऱ्यात!!शाकिर शेख यांचा इशारा.. 'विंटेज आणि रेट्रो फॅशन' ट्रेंड..सुजयदादांच्या चाहत्यांना पण भुरळ!! मोठं खेड ते ऐतिहासिक शहर..सुजय विखेंनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणी.. कार्यक्रम शासकीय मात्र..विखेंचे "आमंत्रण" राम शिंदेंनी ठोकरले! दुरावा अधोरेखित होणार!! देशाला मिळणार उपपंतप्रधान!! "संघा"च्या आधारावर संजय राऊत यांनी दिली आतली बातमी!!
4.6 C
New York
Monday, October 19, 2026

मोठी बातमी..बारामती, शिरूर नंतर आता नगर!! लंकेंच्या यंत्रणेकडून गंभीर आरोप..

काय करतेय महसूल व पोलीस यंत्रणा..!!

निलेश लंके यांच्याकडून व्हिडीओ ट्विट..

ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करणारा लंके यांच्या यंत्रणेने रंगेहात पकडल्याचा दावा!!

- Advertisement -

नगर:
नगर दक्षिण मतदार संघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करताना एक बेकायदेशीर व्यक्ती निलेश लंके प्रतिष्ठानच्या यंत्रणेने रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे. या बाबतचे सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये एक व्यक्ती सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करत असल्याचा व्हिडीओ लंके यांच्या यंत्रणेकडून व्हायरल करण्यात आला असून महसूल आणि पोलीस यंत्रणेवर सुरक्षे बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न नीलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडल्याचे याबाबत सांगण्यात येत आहे. केंद्र, राज्य व स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना सुद्धा एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता तसेच त्यांची परवानगी न घेता थेट गोदामाच्या शटर जवळ जातेच कशी? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अगदी त्या भागातील वाहतूकही वळविण्यात आलेली असताना  पालकमंत्री विखे हे प्रशासनावर दबाव आणत आहेत, की प्रशासनच झोप घेतल्याचं सोंग करत आहे ? असा प्रश्न लंके यांच्या यंत्रणेने उपस्थित करत सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे म्हंटले आहे.या बाबत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे.

- Advertisement -

या बाबत मविआचे उमेदवार निलेश लंके यांचे निकटचे सहकारी राहुल झावरे यांनी त्यांच्या ऑफीसिएल व्हाट्सएपच्या ग्रुपवर सांगितले आहे की, “रात्री आठ वाजून 22 मिनिटांनी अचानक एक व्यक्ती या ठिकाणी आला पोलीस सीआरपी सुरक्षा यंत्रणा la कोणतीही कल्पना न देता या ठिकाणी आलाच कसा त्याच वेळेस तिथे उपस्थित असणाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठान कार्यकर्त्यांना ही घटना समजली त्यांनी ताबडतोब हा व्यक्ती कोण आहे पोलिसांना विचारणा केली त्यावेळेस त्यांना सुद्धा ह्या व्यक्तीबद्दल काहीही माहिती नव्हती त्या अज्ञात व्यक्तीने सांगितले की मला फक्त कलेक्टर साहेब विचारतील तुझं काय काम आहे बाकी कोणाचा काही संबंध नाही मी टेक्निकल चा माणूस आहे बेकायदेशीर रित्या हा माणूस तिथपर्यंत पोहोचला कसा गोदामाचा शटर  जवळ गेला कसा तेरी सुरक्षा यंत्रणा असताना गोदामाचा ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणा madhe छेडछाड करत असताना निलेश लंके यांच्या जिवाभावाचा कार्यकर्ते  त्याचा डाव हाणून पाडला केंद्र राज्य स्थानिक पोलीस ही तेहरी सुरक्षा असताना हा व्यक्ती आत आला कसा याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे” असे सांगण्यात आले आहे.

या बाबत अद्याप जिल्हा निवडणूक यंत्रणा,पोलीस यांच्या कडून अजून स्पष्टीकरण आलेले नाही.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा