शिर्डी:
2014 ला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, कोटीच्या संख्येत बेरोजगारांना रोजगार देऊ अशा बाता मारल्या. नंतर त्यांनीच हा चुनावी जुमला असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. आता 2024 लोकसभा निवडणुकीत मोदी गॅरेंटी नावाने 2014चा जुमला खेळला जात आहे. मात्र आता या जुमला गॅरंटीवर जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याचा घनाघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिर्डीत केला.
आज शुक्रवारी शिर्डी अनुसूचित जाती राखीव लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करतेवेळी आदित्य ठाकरे उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारवर मोठी तीव्र शब्दात टीका केली. भाजपने 2014ला अनेक आश्वासने दिली. हा सर्व चुनावी जुमला असल्यास दिसून आले. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, नोटाबंदी केली यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. देशातील अर्थव्यवस्था कोलमडली अनेकांची रोजगार गेले, एकूणच गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाची अर्थव्यवस्था बिघडवून टाकली आहे. युवकांना रोजगार नाही,.महिला सुरक्षित नाही, शेतकऱ्यांना मालाचा भाव मिळत नाही, उद्योजक अडचणीत आहेत. मात्र यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत.
मोदी गॅरेंटी च्या नावाखाली पुन्हा एकदा देशातील जनतेला फसवलं जाण्याचा प्रयोग सुरू आहे. मात्र जनता यावेळी त्याला बधनार नसून राज्यात आणि देशात भाजपचे सरकार जाणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळी ठासून सांगितलं. सध्या भाजपाने मोदी गॅरंटी यावर मत मागण्यास सुरुवात केली आहे मात्र महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये जनतेने या अगोदरच उद्धव ठाकरे गॅरंटीवर शिक्कामोर्तब केले आहे. आमच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात आम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने कर्ज मुक्ती केली, कोणत्याही कागदपत्रांची अनाठायी मागणी न करता सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न सरकार ने केला. कोरोना काळात लाखो जीव वाचवले. सरकारने केलेला कामाचे जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे जनतेला आता मोदी गॅरंटी नकोय तर ठाकरे यांच्या गॅरंटीवर पूर्ण विश्वास असल्याने राज्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याबद्दल शंका नसल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.