प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त असताना निलेश लंके यांच्या आदेशाने दिपक लंके,बापु शिर्के व राजू रोडे यांच्या पाठपुराव्याला यश !
दुखि:त कोळेकर कुटुंबाला मिळवून दिली 25 लाखाची शासकीय मदत..
पारनेर-(प्रतिनिधी श्रीकांत चौरे):
महाराष्ट्रातील सर्वाधिक मेंढपाळ समाज पारनेर तालुक्यात ढवळपुरी व परिसरात विखुरला गेला आहे. आपले पशुधन घेऊन व स्वतःच्या कुटुंबाची उपजीविके साठी वर्षातील किमान आठ महिने तालुका सोडून इतरत्र जात असतात .या पैकी पारनेर तालुक्यातील धोत्रे गावातील रहीवाशी संजय कोळेकर हे उपजिवीके साठी आपले पशुधन घेऊन शिरोली खुर्द॥ तालुका जुन्नर येथे आपली वृद्ध आई ,पत्नी व छोटी दीड वर्षाची कुमारी संस्कृती हीस घेऊन एका शेतात आपला मेंढराचा वाडा टाकला होता.गुरुवारी पहाटे पाच वाजता झोपेत असताना भरवस्तीत बिबट्या शिरून त्या चिमुकल्या संस्कृतीला झोपेच्या अवस्थेत उचलून नेले.प्रसंगी त्या बालिकेचा घटनास्थळापासून काही अंतरावरच फक्त एक हात पहावयास मिळाला.
अकस्मात झालेल्या या घटनेमुळे सदर कुटुंबावर दुःखाची अवकळा पसरली.काही क्षणात शिरोली येथील स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क केला व धोत्रे गावचे सरपंच राजू रोडे यांना संपर्क करून सर्व माहिती दिली . परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजू रोडे यांनी पहाटे साडेपाच वाजता निलेश लंके यांच्याशी संपर्क करून हा दुर्दैवी प्रकार त्यांना सांगितला .संपूर्ण निलेश लंके परिवारावर धनगर बांधवांबद्दल विशेष आपुलकीचे नाते आहे ही गोष्ट सर्वश्रुत आहे .निलेश लंके यांनी तात्काळ जुन्नर येथील वनक्षेत्र अधिकाऱ्यांची फोनवरून चर्चा करत सदर अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन सविस्तर पाहणी करण्यास सांगीतली.व या गरीब कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत कशी मिळवून देता येईल त्यासाठी त्यांचे जेष्ठ बंधू दीपक अण्णा लंके,बाजार समितीचे उपसभापती बापूशेठ शिर्के व धोत्रे गावचे सरपंच राजुशेठ रोडे यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन सदर कुटुंबाला मदत मिळावी म्हणून प्रशासकीय पाठपुरावा करण्यास सांगितले.
दीपक अण्णांच्या पाठपुराव्याला आखेर यश आले.वनक्षेत्र अधिकारी श्री.प्रदीप चव्हाण यांच्याशी चर्चा करत व संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करत वनविभागाकडून 25 लक्ष रुपयाची आर्थिक मदत त्या कोळेकर कुटुंबास मिळवून देण्यात यशस्वी ठरले. मृत झालेली कुमारी संस्कृतीचे वडील संजय कोळेकर यांच्या खात्यावर पंधरा लक्ष रुपये तात्काळ जमा ही झाले व उर्वरित दहा लक्ष रुपये दोन दिवसात जमा होतील असे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. प्रदीप चव्हाण यांनी सांगितले .नगर दक्षिण लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार असणारे निलेश लंके यांनी प्रचाराच्या रणधुमाळीच्या व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ काढत कु.संस्कृती संजय कोळेकर यांचा मृत्यूमुळे सदर कुटुंबाला झालेल्या दुखाःतुन सावरण्यासाठी 25 लक्ष रुपये इतकी भरीव मदत मिळवून दिली.
आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ काढून सदर कुटुंबाला आर्थिक शासकीय मदत मिळवून दिल्याबद्दल समस्त धनगर बांधवांकडून निलेश लंके प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे .