Latest news
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का ना... पूरग्रस्त परिस्थितीत डंका विखेंचाच!! अहिल्यानगर मधे नवनीत राणा, नांगरे पाटील.. केरळचे राज्यपालांची या कार्यक्रमास उपस्थिती नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड
14.2 C
New York
Thursday, October 9, 2025

“संपदा”  घोटाळ्यात ज्ञानदेव वाफरे’सह सर्व आरोपी दोषी..8 एप्रिलला शिक्षा सूनावणार

“संपदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर मधील आरोपी ज्ञानदेव सबाजी वाफारे सह सर्व आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने, अपहारा प्रकरणी धरले दोषी”

नगर:
अहमदनगर आरोपी क.१ नामे ज्ञानदेव सबाजी वाफारे, आरोपी क.२ नामे सुजाता ज्ञानदेव नाफारे, आरोपी क.३ नामे सुधाकर परशुराम थोरात, आरोपी क.४ नामे भाउसाहेब कुशाबा द्वारे, आयेगी क.५ नामे उत्तमराव दगडू चेमटे, आरोपी क.६ नामे दिनकर बाबाजी दुने, आरोपी क७ जाने विष्णूपंत गणपत व्यवहारे, आरोपी क.८ नामे राजे हसन अमीर, आरोपी क.९ नामे बबन देवराम झावरे, आरोपी क.१० नामे लहू सयाजी भंगाळे, आरोपी क.१९ नामे हरिश्चंद्र सावळेराम लोंढे, आरोपी क.१२ नामे रविंद्र विश्वनाथ शिंदे, आरोपी क.१३ नामे साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर, आरोपी क.१४ नामे संजय चंपालाल बोरा, आरोपी क.१५ नामे अनुष प्रविण पारेख, आरोपी क.१६ नामे मारूती खंडू रोहोकले, आरोपी क.१७ नामे निमाजी खंडू रोहोकले, आरोपी क.१८ नामे बबन खंडू रोहोकले, आरोपी क.१९ नामे सुधाकर गोपीनाथ मुंबे, आरोपी क.२० नामे गोपीनाथ शंकर सुंबे, आरोपी क. २१ नामे महेश बबन झावरे व आरोपी क.२२ नामे संगिता हरिश्चंद्र लोंढे मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर श्री.एन.आर. नाईकवाडे साहेब यांनी संपदा पतसंस्थेच्या झालेल्या अपहार रक्कम रु.१३ कोटी ३८ लाख ५५ हजार ६६७/प्रकरणी वेगवेगळया कलमांखाली दोषी धरलेले आहे. आरोपीना शिक्षा देणेबाबतची सुनावणी दिनांक ०८/०४/२०२४ रोजी मा. न्यायालयात ठेवलेली आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अनिल ढगे हे काम पाहत आहेत.

सदर सत्र खटल्यामधील लेखा परिक्षक देवराम मारूतराव बारसकर यांनी वरील आरोपींविरूध्द ०१/०८/२०११ रोजी कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर येथे फिर्याद दिली होती. फिर्यादीमध्ये विनातारण कर्ज कर्जदारांना वाटप करण्यात आलेले होते व ते नियमबाहय देण्यात आलेले होते. तसेच सोने तारण कर्ज हेही नियमबाहय देण्यात आले होते. तसेच तत्कालीन संचालक मंडळाचे नातेवाईक व कर्मचारी यांनाही बेकायदेशीररित्या कर्ज वाटप करण्यात आलेले होते. वरील आरोपींनी सदर रक्कमेचा अपहार करून सदर रक्कम स्वतः ने फायद्याकरिता वापरली होती. तसेच रकमेबाबत खोटया नोंदी करून सभासदास चुकीची माहिती देवून कायदेशिररित्या आर्थिक संस्था चालविताना ठेवीदाराच्या ठेवीचा विनीयोग बेकायदेशिरपणे अटी व नियम यांचे पालन न करता सभासदांच्या ठेवी परत करण्यास असमर्थता दर्शविली व ठेवीदारांचे रकमेची अफरातफर करून फसवणूक एकुण रक्कम रु.१३,३८,५५,६६७/ केली म्हणून फिर्यादी यांनी आरोपी विरुष्द भा.द.वि. कलम १७७, ४०९, ४१७, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब) व महाराष्ट्र ठेविदारांचे हितसंरक्षण कायदा १९९९ चे कलम ३ प्रमाणे फिर्याद दिलेली होती. सदर सत्र खटल्याचे कामकाज व अंतिम युक्तीवाद होवून आरोपींना आज रोजी मा.न्यायालयाने वरील कलमान्वये दोषी घरलेले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा