Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
20.3 C
New York
Monday, August 25, 2025

शिवाजी कर्डीले किंगमेकरच्या भूमिकेत! दक्षिण-उत्तरेत रणनीतीची जबाबदारी!!

नगर:
अपक्ष असो वा हातात जो झेंडा असेल त्या पक्षाचे असो, शिवाजी कर्डीले आणि विजय हे समीकरण. मात्र 2019च्या विधानसभेत त्यांना पहिल्यांदा पराभवाची चव चाखवी लागली. मात्र असे असले तरी आजही जिल्ह्यातील भले-भले दिग्गज नेते शिवाजी कर्डीले यांच्या हातातील जादुई ताकत ओळखून आहेत. केवळ नगर तालुक्यातच नाही तर मतदार पुनर्रचनेट राहुरी विधानसभेचे भौगोलिक क्षेत्र बदलले तरी 2009 आणि 2014ला ते लीलया निवडून आले. कर्डीलेंनी राजकारणाची ओळ्खलेली नाडी, प्रचंड जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि जोडीला असलेले नातेसंबंध!! या नाते संबंधावर नगर शहरातील महानगरपालिकेचे राजकारण असो वा कृषी उत्पन्न बाजार समिती असो.. मतदारसंघातील जिल्हापरिषदेचे गट, पंचायत समिती, आणि ग्रामपंचायती या सर्व ठिकाणी आपला खास “दबदबा” कसा ठेवायचा हे कर्डीले यांना उत्तमपणे माहीत आहे. एकूणच शिवाजी कर्डीले म्हणजे विजयाचा फॉर्म्युला हे समीकरण आणि म्हणूनच त्यांच्या कडे “किंगमेकर” म्हणून पाहिले जाते.

आता लोकसभा निवडणुकीत शिवाजी कर्डीले  महायुतीतील नगर दक्षिण आणि शिर्डीची सूत्रे हलवत आहे. दोन्ही जागेवर महायुतीचे उमेदवार निवडणून आणण्याची आणि त्यासाठी लागणारी रणनीती आखण्याची जबाबदारी विखे परिवाराने शिवाजी कर्डीले यांच्या कडे दिल्याचे दिसून येत आहे. नगर शहर, नगर तालुका, राहुरी विधानसभा या ठिकाणी कर्डीले मोठी भूमिका बजावू शकणार आहे. नगर शहराचे आ.संग्राम जगताप, माजी महापौर संदीप कोतकर, शिवसेनेचे गाडे कुटुंबातील अमोल गाडे यांचे ते सासरे आहेत. शिवाजी कर्डीले गावचे सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले आहे. साहजिकच वेगवेगळ्या निवडणुकांचा पाया ते कळस कसा गाठून विजयश्री कशी आपल्याकडे खेचून आणायची याचे तंत्र त्यांना चपखल माहीत आहे.

एकूणच शिवाजी कर्डीले यंदा लोकसभेच्या निमित्ताने केवळ नगर दक्षिणच नव्हे तर शिर्डी मतदारसंघात किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार आहे. भले 2019 ला त्यांचा राहुरी मध्ये पराभव झाला असेल आणि या पराभवाला कर्डीले यांनी विखे यांना जबाबदार धरत नाराजी व्यक्त केली असेल मात्र गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या दरम्यानच्या काळात विखे-जगताप-कर्डीले मेतकूट जमून आले आहे. आता या एकत्र आलेल्या त्रिकुटात राजकीय दृष्टीने सर्वांचा फायदा असल्याने विखे परिवाराने निवडणुकीत कर्डीले यांना चांगलेच ऍक्टिव्ह केले आहे. गुरुवारी नगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित असताना कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी शिर्डीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे आवर्जून उपस्थित होते. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या महायुतीतील पदाधिकारी यावेळी झाडून उपस्थित होते. यासर्व ठिकाणी शिवाजी कर्डीले केंद्रस्थानी दिसून आले. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, महायुतीचे फोटोसेशन, पत्रकात परिषद या नंतर विखे, कर्डीले, लोखंडे, कमलाकर कोते या चौघांत कार्यालयात एका कोपऱ्यात बाजूला बसत दीडे-एक तास गुफ्तगु झाली. एकूणच विखेंनी शिवाजी कर्डीले यांच्यावर मोठी जबाबदारी टाकल्याचे बोलले जात असून या निमित्ताने कर्डीले पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत!!

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा