नगर:
काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी उत्कर्षा रूपवते या सध्या काँग्रेस पक्षावर नाराज असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेला जागा गेल्याने आणि या ठिकाणावरून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी महाविकास आघाडी कडून घोषित झाल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या आहेत. शनिवारी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत राजगृह इथे भेट घेतली. याबाबत उत्कर्ष रुपवते यांना विचारले असता काँग्रेस पक्षाला शिर्डी लोकसभेची जागा न मिळाल्याबद्दल मी नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची बैठक प्राथमिक स्वरूपाची होती. विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली. शिर्डी मतदार संघातील परिस्थितीची त्यांनी माहिती यावेळी समजून घेतली. आद्याप मी कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं रुपवते यांनी न्यूजनगरी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. येणाऱ्या तीन दिवसात समर्थक कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय करून उमेदवारी बाबत आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
उत्कर्षा रुपवते तीन दिवसांत उमेदवारीबाबत निर्णय घेणार,आंबेडकरांची घेतली भेट..
- Advertisement -