नगर:
गेले अनेक महिने मोठी उत्सुकता ताणलेला आमदार निलेश लंके यांचा आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये जाहीर प्रवेश होणार असे बोलले जात आहे. स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ही पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत असून या पत्रकार परिषदेला आमदार निलेश लंके हेही उपस्थित असणारा अशी माहिती मिळत आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्षांनी यवृत्ताला दुजोरा दिला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आमदार निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करून घेत आहेत. त्यामुळे लंके हे अजित पवारांना रामराम करत हातातील घड्याळ काढून ठेवत हातात तुतारी घेणार आहेत असे दिसून येत आहे. गेले काही महिने आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार अशी मोठी चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक कार्यक्रम घेतले. या माध्यमातून लंके दांपत्य लोकसभा निवडणूक लढवणार अशी मोठी शक्यता निर्माण झाली होती. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत प्रश्नचिन्ह होते. स्वतः निलेश लंके याबाबत कोणतेही भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करत नव्हते. मात्र एकूणच नगरमध्ये आयोजित शिवपुत्र संभाजी महानाट्याचे निमित्ताने या व्यासपीठावर महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे यांनीही त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्याचं आवाहन करत हातात तुतारी घ्या अशी विनंती केली होती. काल रविवारी निलेश लंके यांचा वाढदिवस होता या वाढदिवसाचे निमित्तानेही अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागत स्वागतासाठी तुतारी वाजवण्यात आली. मात्र कालही रात्रीपर्यंत आमदार निलेश लंके यांनी कोणतेही भाष्य केले नव्हते. मात्र आज पुण्यामध्ये शरद पवार पत्रकार परिषद घेत असून या पत्रकार परिषदेमध्येच आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असणार असतील. ते स्वतः किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके या दोघांपैकी एक जण शरद पवार गटाकडून उमेदवारी करू शकतो अशी परिस्थिती दिसून येत आहे.
अखेर आज आ.निलेश लंके शरद पवारांच्या उपस्थितीत हातात तुतारी घेणार!!
- Advertisement -