डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार अभियंता परिमल निकम यांना जाहीर; पुरस्काराचे वितरण 12 मार्च रोजी होणार
अहमदनगर (प्रतिनिधी):
राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार अहमदनगर शहरातील महानगरपालिकेतील अभियंता परिमल निकम यांना जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे समवेत समीर भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, अंकुश मोहिते, सुभाष वाघमारे, राजा जयस्वाल, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, संदीप वाकचौरे, अँड. अनिकेत कुलट, ओमकार लहारे आदीसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार महापालिकेचे अभियंता परिमल निकम यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजामध्ये अभिमानास्पद बाब असून आ.संग्राम जगताप यांच्या वतीने निकम यांच्या हस्ते समाजासाठी अधिकाधिक सामाजिक सेवा घडो या
देखील शुभेच्छा देण्यात आल्या.
पुरस्काराचे वितरण येत्या मंगळवारी १२ मार्च रोजी होणार असून सर्व नगर शहरातील मित्रपरिवार उपस्थित राहणार असल्याची भावना व्यक्त करत हा पुरस्कार परिमल निकम यांच्या वडिलांना देखील २००६-०७ मध्ये मिळालेला आहे. त्यामुळेच निकम परिवाराचे सामाजिक कार्य समाजासाठी मोठे असल्याची भावना व्यक्त केली तर सत्काराला उत्तर देत परिमल निकम म्हणाले की, समाजाबद्दल जे सामाजिक कार्य केले त्याची दखल घेतलेली असून यामध्ये समाजाचे देखील आभार मानले व या पुरस्कारानंतर देखील समाजासाठी सामाजिक कार्य चालू ठेवणार असल्याची भावना व्यक्त केली. तसेच निकम यांचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
