पाथर्डी(प्रतिनिधी):
जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 कार्यक्रमाला पाथर्डीतील असंख्य महिला भगिनी या उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. या रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे सर्वांचाच उत्साह हा शिगेला पोहोचला दिसून आला. पाथर्डीतील असंख्य महिला वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभागी होत रंगारंग कार्यक्रमाचा आनंद लुटला. या रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे सर्वांचाच उत्साह हा शिगेला पोहोचला होता.
गायक अवधूत गुप्ते यांच्या गाण्यावर भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी ठेका धरला. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी ऐका दाजीबा.., पाव्हन जेवलास का.., आया है राजा अशी गाजलेली गाणी आपल्या नेहमीच्या चार्मिंग मुडवर गायली. केवळ गायलीच नाही तर यावेळी खा.सुजय विखे पाटील यांनीही ठेका धरत डान्स केला. कार्यकर्त्यांचा उत्साह यावेळी प्रचंड दिसून येत होता.
सोनाली कुलकर्णी यांनी आजच्या कार्यक्रमात सुजयदादांबद्दल काढले गौरवोद्गार…
-सोनाली खासदार सुजय दादांबद्दल म्हणाल्या की, एरवी नेते मंडळी पुढच्या रांगेत सोफ्यावर बसून कार्यक्रमाचा आनंद घेतात. परंतु दादांचे तसे नाही, कुठलाही बडेजावपणा न करता कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये कुठेतरी हरवलेले असतात. दादा आहेत की नाही कार्यक्रमात याची शोधाशोध आम्हाला करावी लागते आणि म्हणूनच दादांना जनतेचे नेते म्हणतात. वारंवार त्यांच्या कार्यातून आणि वागणुकीतून हे दिसून येते. लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांच्याकडे पाहिल्यावर समजते.