आ.लंके यांचा रनरेट सर्वाधिक, त्यांच्या मनोकामना पूर्ण होवोत!
नगर(प्रतिनिधी):
टी ट्वेण्टी क्रिकेटमध्ये कमी चेंडुंत सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूप्रमाणे आ. नीलेश लंके यांचा रनरेट सर्वाधिक आहे. सर्वाधिक लोकांच्या गळयातील ताईत बनलेले आमदार म्हणजे आ. लंके हे आहेत. जनतेच्या भरपूर शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. जनता खंबिर आहे. त्यामुळे त्यांना भविष्याची कसलीही काळजी करण्याचे कारण नाही. ज्याच्या मागे जनता असते त्याला कुणाचीही काळजी करण्याची गरज नसते हे या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पहायला मिळत असल्याने माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
आ.नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाटयास आ.राम शिंदे यांनी शनिवारी हजेरी लावत जोरदार बॅटिंग करत जिल्ह्यातील सद्य राजकीय स्थितीवर अप्रत्यक्ष भाष्य केले. यावेळी मा. आ. चंद्रशेखर कदम, राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंखे, घनश्याम शेलार, प्रा. मधुकर राळेभात, गहिनीनाथ शिरसाट, दीपक भोसले, करण ससाने, प्रियाताई कदम, छायाताई फिरोदिया, प्राचार्य पोपट तांबे, बाळासाहेब उगले, बंडू पाटील बोरुडे, रोहिदास कर्डिले, डॉ सुदर्शन पोटे यांच्यासह लाखो प्रेक्षक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना महानाटयास नागरीकांचा उर्स्फुत प्रतिसाद लाभला आहे. लोकांना बसण्यासाठी जागा नाही. आ. नीलेश लंके हे स्वतः लोकांना बसण्याची व्यवस्था करीत आहेत. लोकांच्या मनामध्ये काय आहे, लोकांना कशाची गरज आहे ते नेमकेपनाने शोधून आ. लंके यांच्या संकल्पनेतून आ. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने या महानाटयाचे नगर शहरात जिल्हयासाठी आयोजित केला आहे, त्यास जनतेने मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला. या महानाटयाच्या रूपाने राजे संभाजी यांचा हुबेहुब इतिहास प्रतिबिंबित होणार आहे. संभाजी महाराजांचा इतिहास आज इतक्या वर्षानंतरही दैदिप्यमान आहे. लोकांना जे हवे आहे ते देण्याचे काम आ. लंके यांनी केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
आ.शिंदे पुढे म्हणाले आ. लंके हे सामाजिक, राजकिय जीवनात काम करत असताना अडचणीतील, गरजवंत लोकांना मदत करण्याचा स्वभाव असलेले व्यक्तीमत्व आहे. कोरोना संकटामध्ये पारनेर तालुक्यात त्यांनी जे काम केले ते नगर जिल्हयासह राज्याला पहायला मिळाले. प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत होता, पळत होता. कोणाला मदत करायची की नाही याचा विचार करीत नव्हता. परंतू लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना वाचविण्याची भुमिका आ. लंके यांनी घेतली. त्यामुळेच कोव्हीड योध्दा म्हणून महाराष्ट्रात, देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कोरण्याचे काम आ. नीलेश लंके व त्यांच्या सहकऱ्यांनी केले.
जनता नेहमी तुमच्या पाठीशी..-राम शिंदे
-जनता तुमच्या पाठीशी ग्रामीण भागातला, दुष्काळी भागातला तरूण जिद्दीने, चिकाटीने, संघर्ष करून लक्ष्य भेदण्याचे काम करतो त्यावेळी तो राजकिय पटलावर, महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर स्थिरावतो. हे आ. लंके यांच्या माध्यमातून आम्हाला, सर्व जनतेला पहायला मिळाले आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचे भविष्य यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून, आपल्या मनातल्या मनोकामना पुर्ण होण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. जनतेच्या हितासाठी संघर्ष करा. नेहमीसाठी जनता तुमच्या पाठीशी उभी राहिल.
आ.राम शिंदे म्हणाले..जनता खंबीर आहे!!
-आ. नीलेश लंके यांनी असेच काम करीत रहावे. जनतेच्या भरपूर शुभेच्छा लंके यांच्या पाठीशी आहेत. जनता खंबिर आहे. त्यामुळे त्यांनी भविष्याची कसलीही काळजी करण्याचे कारण नाही. ज्याच्या मागे जनता असते त्याला कुणाचीही काळजी करण्याची गरज नसते हे या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पहायला मिळते आहे.
प्रचंड गर्दी..
-महानाट्याच्या दुसऱ्या दिवशी गर्दीने पहिल्या दिवशीचा उच्चांक मोडला. मैदानाबाहेर मोठी गर्दी झाल्याने प्रा. राम शिंदे यांनी कणात वर करा अशी सूचना केली. सूचनेप्रमाणे मागील बाजूचे पत्रे काढण्यात आले. दरम्यानच्या काळात आ. लंके यांनी आणखी १५ हजार खुर्च्यांची व्यवस्था केली होती. एकूण २५ हजार आसन क्षमता वाढूनही हजारो नागरिकांना उभे राहूनच हे नाट्य पहावे लागले.

