आरपीआयचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी घेतली पिडीत मुलीची व कुटुंबीयांची भेट
आरपीआय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी समाज कल्याण विभागातर्फे अर्थसहाय्य व पोलीस संरक्षण मिळवुन देण्याबाबत प्रयत्न करू दिले आश्वासन
अहमदनगर-(कर्जत):
कर्जत तालुक्यात मागासवर्गीय विटभट्टी मजूर कामावर असताना पिडीत मुलगी घराच्या पाठीमागे लघुशंकेसाठी गेली असता आरोपी दोन नराधमांनी तिला उचलून नेऊन तिचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करत तिच्या हातावर ब्लेडने वार करुण दहशत करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना कोणालाही सांगितल्यास वडील व भावास जीवे मारण्याचे धमकी दिली.भयभीत व घाबरलेल्या अवस्थेत अत्याचारित पिडीत मुलीने झालेला प्रकार कोणा सोबत सांगितला नाही.पीडित मुलगी आजारी पडल्याने आईने चौकशी केली असता.तिने घडलेली सर्व घटना सविस्तर सांगितली.त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन सविस्तर माहिती दिली.पोलिसांनी गुन्हा दाखल करुण एका आरोपीस अटक केली. दहशत केल्यामुळे मुलीने दुसऱ्या आरोपीचे नाव सांगितले नव्हते.पुरवणी जबाबामध्ये दुसऱ्या आरोपीचे नाव सांगितले.त्या आरोपीला अटक करण्यासाठी अत्याचारित मुलीचे चुलते यांनी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना फोन करून वरील सर्व प्रकार सांगितल्यानंतर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी पिडित मुलीस व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला व पोलीस अधिकारांशी बोलून गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करून कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी केली.वरील सर्व प्रकार रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना सांगितला.त्यांनी पीडित कुटुंबाला आधार देत आम्ही आपल्या सोबत आहोत.नामदार रामदासजी आठवले साहेब आपल्या सोबत आहेत. आपण घाबरू नका आपणांस पोलीस संरक्षण व समाज कल्याण विभागामार्फत अर्थसहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न करू,पीडित कुटुंबाला मदत करण्याचे अभिवचन प्रदेक्षाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी मोबाईल वरून संवाद साधुन दिले.नामदार आठवले साहेब पार्लमेंट मध्ये अधिवेशनात असल्यामुळे त्यांचा कुटुंबाशी संवाद होऊ शकला नाही.याप्रसंगी अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे,जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ,युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे,जिल्हा नेते रविंद्र दामोदरे,तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव साळवे,सतिष साळवे, आदी उपस्थित होते.